कार्तिक आर्यन पहिल्यांदाच दिसणार ग्रे शेड भूमिकेत, 'फ्रेडी' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 06:29 PM2022-11-17T18:29:51+5:302022-11-17T18:32:37+5:30

Freddy Movie : फ्रेडी हा कार्तिकचा आत्तापर्यंतचा सर्वात आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट आहे.

Kartik Aaryan will be seen in the role of Gray Shade for the first time in 'Freddy' | कार्तिक आर्यन पहिल्यांदाच दिसणार ग्रे शेड भूमिकेत, 'फ्रेडी' सिनेमात

कार्तिक आर्यन पहिल्यांदाच दिसणार ग्रे शेड भूमिकेत, 'फ्रेडी' सिनेमात

googlenewsNext

कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)ने आतापर्यंत लव्हरबॉय आणि चॉकलेट बॉयच्या भूमिकेत पाहायला मिळाला. मात्र आता तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फ्रेडी (Freddy Movie) चित्रपटातून तो पहिल्यांदाच ग्रे शेड लव्हरबॉय साकारताना दिसणार आहे. फ्रेडी हा कार्तिकचा आत्तापर्यंतचा सर्वात आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अलाया एफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.   

फ्रेडी ही डॉ. फ्रेडी जिनवाला (कार्तिक आर्यन) ची कहाणी आहे. फ्रेडी हा एकलकोंडा असून तो त्याच्या मिनीएचर विमानांसोबत रमतो. त्याचा एकमेव मित्र म्हणजे त्याचे पाळीव कासव 'हार्डी'. ट्विस्ट आणि वळणांनी भरलेले एक मनोरंजक कथानक, फ्रेडी प्रेक्षकांना त्यांच्या आसनांवर खिळवून ठेवेल.

कार्तिक म्हणाला की, "हे पात्र डार्क आहे, आपण नेहमी पाहत असलेल्या पारंपरिक बॉलिवूड हिरोसारखे ते नाही. तुम्ही त्याला रूढार्थाने हिरो म्हणू शकत नाही. फ्रेडीमधील माझ्या पात्राने मला एक वेगळा दृष्टीकोन दिला. मला एक नवी बाजू एक्सप्लोर करण्यास मदत केली आणि प्रत्येक टप्प्यावर एक अभिनेता म्हणून माझ्या क्षमतांना आव्हान देण्यासाठी मला प्रोत्साहीत केले.


कार्तिक आर्यन पुढे म्हणाला, हे वेगळे आहे. हे मनोरंजक आहे. हा डार्क थ्रिलर आहे जो मधल्या काही काळापासून गायब झाला होता. फ्रेडी तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यातून ओढून सीटच्या काठावर खिळवून ठेवेल. हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षक या चित्रपटासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतील.

Web Title: Kartik Aaryan will be seen in the role of Gray Shade for the first time in 'Freddy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.