दाऊदला भिडणाऱ्या या अंडवर्ल्डची डॉनची भूमिका साकारणार कार्तिक आर्यन! विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 18:30 IST2024-04-01T18:30:00+5:302024-04-01T18:30:00+5:30
कार्तिक आर्यनला 'भूल भूलैय्या 3' च्या रिलीजआधीच अंडरवर्ल्डमधील एका डॉनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.

दाऊदला भिडणाऱ्या या अंडवर्ल्डची डॉनची भूमिका साकारणार कार्तिक आर्यन! विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन
कार्तिक आर्यन सध्या चांगलाच चर्चेत आहे. कार्तिक सध्या 'भूल भूलैय्या 3' च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो कबीर खानसोबत 'चंदू चँपियन' सिनेमाचं शूटींग करत आहे. कार्तिकच्या दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता असतानाच कार्तिकच्या पारड्यात अजून एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. कार्तिक विशाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी बायोपीक सिनेमात झळकणार आहे.
विशाल भारद्वाज यांच्या आगामी क्राईम थ्रिलर बायोपीकसाठी कार्तिकची वर्णी लागली आहे. कार्तिक या सिनेमात दाऊदला भिडणाऱ्या डॉन हुसेन उस्ताराची भूमिका साकारणार आहे. सुरुवातीला या सिनेमाचं नाव 'सपना दीदी' असं होतं. या सिनेमात आधी इरफान खान प्रमुख भूमिका साकारणार होता. परंतु आता या सिनेमाचं शीर्षक बदललं असून कार्तिक सिनेमात डॉन हुसेन उस्ताराची प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
Kartik Aaryan Starrer Vishal Bharadwaj Film Is ‘Sapna Didi’ With New Perspective Of Male Gangster, Check Out The Details!
— Box Office Worldwide (@BOWorldwide) April 1, 2024
Read here: https://t.co/sCdKa6b7rh#kartikaaryan#vishalbharadwaj#sapnadidi#irrfankhan@TheAaryanKartikpic.twitter.com/A0OnPoaKWN
साजिद नाडियादवाला निर्मित या सिनेमाचं शूटींग सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होणार आहे. याशिवाय अश्रफ खान म्हणजेच सपना दीदीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे कार्तिक आर्यन अनीस बज्मींच्या 'भूल भुलैया 3' चं पहिले शेड्यूल पूर्ण करून कबीर खानच्या 'चंदू चॅम्पियन'मधील भूमिकेसाठी तयारी करत आहे.