कार्तिक आर्यनच्या ‘लुका छुपी’वर सेन्सॉर बोर्डाची कात्री!  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 10:37 AM2019-02-28T10:37:29+5:302019-02-28T10:42:56+5:30

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही बदल सुचवत, चार दृश्यांना कात्री लावली आहे.

kartik aryan and kriti senon starrer luka chuppi film cbfc passes 4 cuts | कार्तिक आर्यनच्या ‘लुका छुपी’वर सेन्सॉर बोर्डाची कात्री!  

कार्तिक आर्यनच्या ‘लुका छुपी’वर सेन्सॉर बोर्डाची कात्री!  

googlenewsNext
ठळक मुद्देकार्तिक आर्यनच्या याआधी आलेल्या ‘सोनू की टीटू की स्वीटी’ या चित्रपटात १०० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे कार्तिकच्या ‘लुका छुपी’कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन यांचा ‘लुका छुपी’ हा सिनेमा उद्या १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पंकज त्रिपाठी, विनय पाठक, अपारशक्ती खुराणा यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आधी या चित्रपटाचे ‘मथुरा लाईव्ह’ असे नामकरण करण्यात आले होते. पण पुढे ते बदलून ‘लुका छुपी’असे नवे नामकरण करण्यात आले. हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित आहेत.  साहजिकच, चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून पास होण्याची प्रतीक्षा होती. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही बदल सुचवत, चार दृश्यांना कात्री लावली आहे. चित्रपटातील तीन आॅडिओ आणि एक व्हिज्युअल बदलण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिलेत. या कट्सनंतर चित्रपटाची लांबी २ तास ६ मिनिटे आणि ६ सेकंद झाली आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटास यू/ए सर्टिफिकेट दिले आहे.


चित्रपटात कार्तिक ग्वाल्हेरच्या एका मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. २५ कोटी खर्चून तयार झालेला हा चित्रपट देशभरातील ३००० स्क्रिन्सवर रिलीज होतोय. ‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुका छुपी’ हा  धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे.
कार्तिक आर्यनच्या याआधी आलेल्या ‘सोनू की टीटू की स्वीटी’ या चित्रपटात १०० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे कार्तिकच्या ‘लुका छुपी’कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीत उतरतो, ते बघुच.

Web Title: kartik aryan and kriti senon starrer luka chuppi film cbfc passes 4 cuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.