कार्तिक आर्यनने सांगितले, त्याला सेंटर शॉक असे का संबोधतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 06:00 AM2018-12-12T06:00:00+5:302018-12-12T06:00:00+5:30

कार्तिक आर्यन लवकरच कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Kartik Aryan said, why does he call it a center shock? | कार्तिक आर्यनने सांगितले, त्याला सेंटर शॉक असे का संबोधतात?

कार्तिक आर्यनने सांगितले, त्याला सेंटर शॉक असे का संबोधतात?

googlenewsNext
ठळक मुद्देकार्तिक आर्यन झळकणार 'किरिक पार्टी' चित्रपटात


बॉलिवूडचा हॅण्डसम बॉय म्हणजेच अभिनेता कार्तिक आर्यनचा काही महिन्यांपू्र्वी 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अभिनयाने कार्तिक प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. या चित्रपटानंतर तो आता इम्तियाज अलीच्या सिनेमात काम करणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच कार्तिकने नेहा धुपियाचा चॅट शो 'नो फिल्टर नेहा'मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कार्तिक आर्यनने त्याला सेंटर शॉक असे बोलले जाते. त्याला या नावाने का संबोधतात, याचा खुलासा कार्तिकने केले आहे.
कार्तिक आर्यन म्हणाला, 'मला माझ्या केसांमुळे सेंटर शॉक असे संबोधतात. कारण माझे केस नेहमी उभे राहतात. आणि कोकी 
या नावानेही संबोधले जाते. हे नाव त्याला अजिबात आवडत नसल्याचे सांगितले. '
कार्तिकने धर्मा प्रोडक्शनचा चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्याबाबत सांगितले की, 'तो खूप चांगला सिनेमा होता. या चित्रपटातील भूमिकेशी मी कनेक्ट होत नव्हतो. त्यामुळे मी या सिनेमात काम करण्यास नकार दिला.'
कार्तिक आर्यन लवकरच कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'किरिक पार्टी' हा कन्नड चित्रपट यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि हा चित्रपट शंभर दिवसांहून अधिक काळ चित्रपटगृहात होता. कन्नडमध्ये जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारीत असून इंजिनिअरिंग महाविद्यालयात फर्स्ट इयरला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा रेखाटण्यात आली आहे.

Web Title: Kartik Aryan said, why does he call it a center shock?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.