'हा सिनेमा तरी बनेल अशी आशा', करण जोहरसोबतच्या या फोटोवर कार्तिक म्हणाला, "आमचं नातं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 17:00 IST2025-01-18T17:00:00+5:302025-01-18T17:00:02+5:30

करण जोहर आणि कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन 'हा' मराठमोळा दिग्दर्शक करणार आहे.

kartik aryan says he has love and hate relationship with karan johar working together in next film | 'हा सिनेमा तरी बनेल अशी आशा', करण जोहरसोबतच्या या फोटोवर कार्तिक म्हणाला, "आमचं नातं..."

'हा सिनेमा तरी बनेल अशी आशा', करण जोहरसोबतच्या या फोटोवर कार्तिक म्हणाला, "आमचं नातं..."

कार्तिक आर्यन (Kartik Aryan)  आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यात जुना वाद आहे. 'दोस्ताना 2' सिनेमावेळी त्यांच्यात बिनसलं होतं. मात्र तरी आता कार्तिक सगळं विसरुन करणच्या सिनेमात आला आहे. 'तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी' सिनेमात कार्तिक झळकणार आहे. करण जोहर सिनेमाची निर्मिती करणार आहे. कार्तिक आर्यनला सध्या इंडस्ट्रीत फार मागणी आहे त्यामुळे करणनेही त्याच्यासोबत जुळवून घेतल्याचं दिसत आहे. दरम्यान दोघांच्या एका फोटोमागचं गणित कार्तिकने नुकतंच सांगितलं. 

कार्तिक आणि करणचा फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये करण जोहरचे कार्तिकचे कान पकडताना दिसत आहे. या फोटोवरुन कार्तिकला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, "यावर काय बोलू? मला वाटतं माझं आणि करणचं नातं लव्ह अँड हेट सारखं आहे. हा फोटो तेच सांगतो. हा तो क्षण होता जेव्हा आम्ही पहिला सिनेमा साईन केला. जो सिनेमा बनणार होता. मला वाटतं त्यांना आधीच माहित होतं की मी....म्हणून त्याने आधीच फोटो घेतला."

तो पुढे म्हणाला, "पण आता मी त्यांच्यासोबत सिनेमा करतोय. आम्ही एकत्र आलो आहोत. मला आशा आहे की हा सिनेमा तरी बनेल. हा सिनेमा मी पूर्ण करेन आणि तेही करतील." 

'तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी' हा सिनेमा धर्मा प्रोडक्शनखाली बनत आहे. मराठमोळे समीर विद्वंस सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. २०२६ साली सिनेमा रिलीज होईल.

Web Title: kartik aryan says he has love and hate relationship with karan johar working together in next film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.