काय आहे दुलकर सलमानच्या नावामागची कथा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 17:34 IST2018-08-02T17:33:30+5:302018-08-02T17:34:57+5:30
साऊथ स्टार दुलकर सलमान लवकरच ‘कारवां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.

काय आहे दुलकर सलमानच्या नावामागची कथा?
साऊथ इंडस्ट्रीचा आघाडीचा स्टार म्हणजे दुलकर सलमान. दुलकर सलमान लवकरच ‘कारवां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. या चित्रपटात इरफान खान आणि मिथिला पारकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. साहजिकचं या चित्रपटाबद्दल दुलकर कमालीचा उत्सूक आहे. सध्या दुलकर याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये त्याने मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. दुलकर या नावाचा अर्थही त्याने सांगितला. ‘माझे नाव अरबी भाषेतून घेण्यात आले आहे. कुण्या तत्कालीन सम्राटाच्या नावाशी ते मिळते जुळते आहे. माझ्या नावाबद्दल मला एवढेच सांगण्यात आलेय. मला कुणी दुलकेर म्हणतं, कुणी दलकीर, कुणी दुलकीर. पण योग्य उच्चारण दुलकर आहे. अर्थात प्रेमाने मला कुणी कुठल्याही नावाने बोलवले, तरी मला फरक पडत नाही,’ असे दुलकरने सांगितले.
‘कारवां’नंतर काय, असा प्रश्न दुलकरला केला गेला. यावर आॅफर तर खूप आल्यात. पण यातील बहुतांश माझ्याच साऊथ चित्रपटाचे रिमेक होते. हे रिमेक मला करायचे नाहीत. मी बऱ्याच बॉलिवूड स्क्रिप्ट ऐकल्या. पण ‘कारवां’ पहिला चित्रपट होता, जो मला मनापासून करावासा वाटला. माझ्याच साऊथ चित्रपटाचे हिंदी रिमेक करण्यात मला जराही रस नाही. कारण त्यात मला नवे काहीचं नाही, असेही दुलकर म्हणाला.
‘कारवां’नंतर दुलकी ‘द जोया फॅक्टर’मध्ये दिसणार आहे. यात दुलकर एका क्रिकेट कर्णधाराच्या रूपात आहे. या चित्रपटासाठी दुलकर सध्या क्रिकेटमधील बारकावे शिकतोय. या चित्रपटात तो सोनम कपूरसोबत दिसणार आहे.