मी वाईट सून का? मग तू क्रूर सासू...! गोविंदाची पत्नी सुनीताचा टोमणा ऐकून भडकली कश्मीरा शाह!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:30 PM2021-10-01T12:30:10+5:302021-10-01T12:31:52+5:30

गोविंदाची पत्नी सुनीताने कश्मीराला ‘खराब बहू’ म्हटलं होतं. सुनीताची ही गोष्ट कश्मीराला चांगली बोचली आहे. आता तिने सोशल मीडियावर याला उत्तर दिलं आहे.

Kashmera Shah gets miffed after being called a bad daughter-in-law by Govinda's wife Sunita Ahuja; calls the latter an evil mother-in-law | मी वाईट सून का? मग तू क्रूर सासू...! गोविंदाची पत्नी सुनीताचा टोमणा ऐकून भडकली कश्मीरा शाह!

मी वाईट सून का? मग तू क्रूर सासू...! गोविंदाची पत्नी सुनीताचा टोमणा ऐकून भडकली कश्मीरा शाह!

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता कृष्णावर बरसल्या होत्या.मला यापुढे त्याचं तोंडही पाहायचं नाही,’ असं सुनीता म्हणाल्या होत्या.

गोविंदा (Govinda) आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांच्यातील अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद संपण्याची चिन्ह नाहीत. आता आता काय दोघांच्या बायकांमध्ये जुंपली आहे. अलीकडे गोविंदा व त्याची पत्नी सुनीता (Sunita Ahuja) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार म्हटल्यावर, कृष्णाने हा एपिसोड करण्यास स्पष्ट नकार दिला होता. गेल्या वर्षीदेखील जेव्हा गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये कृष्णा दिसला नव्हता. कृष्णाच्या या वागण्यानं मामी सुनीता  जाम भडकली होती आणि यापुढे मला त्याचं थोबाडंही पाहायचं नाही, असं म्हणून तिनं आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. कृष्णासोबत त्याची पत्नी कश्मीरा शाह ( Kashmera Shah) हिच्यावरही सुनीता बरसली होती. कश्मीराही गप्प बसणा-यांपैकी नव्हती. तिनेही सुनीताबद्दल काही कमेंट्स केल्या होत्या. पुढे हा वाद इतका वाढला की, सुनीताने कश्मीराला ‘खराब बहू’ म्हटलं होतं. घरात वाईट सून आली की, भांडणं सुरू होतात, असं सुनीता म्हणाली होती.

सुनीताची ही गोष्ट कश्मीराला चांगली बोचली आहे. आता तिने सोशल मीडियावर याला उत्तर दिलं आहे. सुनीता आहुजाचं नाव न घेता, कश्मीरानं एक टिष्ट्वट केलं आहे.
‘कामानिमित्ताने काही दिवस बाहेर होते. घरी परतल्यावर वाचलं की, काही लोक आमच्या कौटुंबिक कलहात हात धुत आहे. एक स्टेटमेंट वाचत माझ्या मुलाने मला खराब बहू म्हणजे काय? असा प्रश्न केला. मी उत्तर दिले, खराब सून ती असते जिची सासू क्रूर असते,’असं टिष्ट्वट कश्मीराने केलं आहे.

काय म्हणाल्या होत्या सुनीता?
 ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता कृष्णावर बरसल्या होत्या.  ‘जेव्हा जेव्हा आम्ही शोमध्ये येतो, तेव्हा तो प्रसिद्धीसाठी माध्यमांमध्ये आमच्याबद्दल काही ना काही बोलतो. हे सगळं करूण काय फायदा? घरातल्या गोष्टी लोकांसमोर आणण्यात काही अर्थ नाही. गोविंदा यावर काही बोलू किंवा प्रतिक्रिया देऊ शकत नाही पण यामुळे मला खूप राग येतो. कृष्णाकडे कॉमेडीची प्रतिभा ही फक्त त्याच्या मामा गोविंदाचं नाव घेण्यापुरती मर्यादित आहे. मला यापुढे त्याचं तोंडही पाहायचं नाही,’ असं सुनीता म्हणाल्या होत्या.

Web Title: Kashmera Shah gets miffed after being called a bad daughter-in-law by Govinda's wife Sunita Ahuja; calls the latter an evil mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.