कश्मीरा परदेशी अक्षय कुमारसोबत ह्या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 06:49 PM2018-11-12T18:49:44+5:302018-11-12T18:53:45+5:30

'नरथानासला' या तेलुगू चित्रपटातून कश्‍मीरा परदेशीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आता ती 'मिशन मंगल'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Kashmira Pardeshi will be an entry in Bollywood with Akshay Kumar | कश्मीरा परदेशी अक्षय कुमारसोबत ह्या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

कश्मीरा परदेशी अक्षय कुमारसोबत ह्या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

googlenewsNext
ठळक मुद्दे कश्‍मीरा परदेशीने तेलगू चित्रपटातून केले पदार्पण कश्‍मीरा परदेशी दिसणार अक्षय कुमारसोबत


बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारने आगामी चित्रपट 'मिशन मंगल'ची घोषणा केल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीन वाढली आहे. या चित्रपटात अक्षयसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू झळकणार आहेत. इतकेच नाही तर यात आणखीन एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. 'नरथानासला' या तेलुगू चित्रपटातून पर्दापण करणारी कश्‍मीरा परदेशी या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

'नरथानासला' या तेलुगू चित्रपटातून कश्‍मीरा परदेशीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आता ती 'मिशन मंगल'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाबाबत कश्‍मीरा खूपच उत्साही आहे. हा कश्‍मीराचा दुसरा चित्रपट आहे. आतापर्यत मराठमोळी कश्‍मीरा ही हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर होती. मिशन मंगलचे दिग्दर्शक जगन शक्‍ती यांनी कश्‍मीराला आपल्या चित्रपटासाठी दुजोरा दिला असल्याचे समजते.
दरम्यान, 'मिशन मंगल'शिवाय अक्षय कुमार हा केसरी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सध्या अक्षय कुमार आणि रजनीकांत या दोघा सुपरस्टार कलाकारांचा बिग बजेट असलेला 2.0 चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Kashmira Pardeshi will be an entry in Bollywood with Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.