‘पुष्पा’ची चर्चा थांबेना! ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 01:51 PM2022-02-03T13:51:27+5:302022-02-03T13:54:09+5:30

Kashmiri Version of Srivalli Song : ‘श्रीवल्ली’ गाण्याचं तेलगू, मराठी, हिंदी व्हर्जन तुम्ही ऐकलं असेलच. आता या गाण्याचं काश्मिरी व्हर्जनही व्हायरल होतंय.

kashmiri version of srivalli song of the movie-pushpa viral | ‘पुष्पा’ची चर्चा थांबेना! ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ व्हायरल

‘पुष्पा’ची चर्चा थांबेना! ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

Kashmiri Version of Srivalli Song : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा : द राईज’ने ( Pushpa: The Rise)बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कोरोना काळात अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटले, पण पुष्पाने अशी काही जादू केली की कमाईचे अनेक रेकॉर्ड रचले. चित्रपटासोबत या सिनेमाची गाणी आणि डायलॉगही तुफान व्हायरल झालेत. ‘श्रीवल्ली’ गाण्याने तर धूम केली. या गाण्याचं तेलगू, मराठी, हिंदी व्हर्जन तुम्ही ऐकलं असेलच. आता या गाण्याचं काश्मिरी व्हर्जनही व्हायरल होतंय.

‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन बनवणाऱ्याचं नाव तस्लीम आहे. हारर्मोनियमवरच्या त्याच्या या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काश्मिरी फोक म्युझिकसोबत तस्लीमने ‘श्रीवल्ली’ गाण्याला एक वेगळाच टच दिला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आत्तापर्यंत 45 हजारांवर लोकांनी त्याचा हा व्हिडीओ पाहिला आहे. टिष्ट्वटरवरही या गाण्याची चर्चा आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे तर भजन वाटतंय, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. अन्य एकाने फायर है, असं लिहित स्माईल इमोजी पोस्ट केल्या आहेत.
‘श्रीवल्ली’ गाण्याबद्दल सांगायचं तर हे गाणं देवी श्री प्रसादने कम्पोझ केलं आहे. चंद्रबोसने  याचे बोल लिहिले आहेत. गाण्याचं तेलगू व्हर्जन सिंगर सिड श्रीरामने गायलं आहे. हिंदी व्हर्जनबद्दल सांगायचं तर हिंदीत हे गाणं जावेद अलीने गायलं आहे.

Web Title: kashmiri version of srivalli song of the movie-pushpa viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.