'बाहुबली'च्या कटप्पाला कोरोनाची लागण; प्रकृती अस्वास्थ्यामुळे Sathyaraj रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 02:43 PM2022-01-09T14:43:44+5:302022-01-09T14:45:20+5:30

Sathyaraj: ७ जानेवारीला संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं

katappa of baahubali aka sathyaraj deteriorated health hospitalized due to corona | 'बाहुबली'च्या कटप्पाला कोरोनाची लागण; प्रकृती अस्वास्थ्यामुळे Sathyaraj रुग्णालयात दाखल

'बाहुबली'च्या कटप्पाला कोरोनाची लागण; प्रकृती अस्वास्थ्यामुळे Sathyaraj रुग्णालयात दाखल

googlenewsNext

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनासारख्या असाध्य विषाणूसोबत लढा देत आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यातच आता 'बाहुबली' फेम सत्यराज (Sathyaraj) यांना कोरोनाची लागण झाली असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सत्यराज होते होम आयसोलेट

सूत्रांच्या माहितीनुसार, एका चित्रीकरणादरम्यान सत्यराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे ते घरीच आयसोलेट झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ७ जानेवारीला संध्याकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

अधिकृत माहिती अद्यापही समोर नाही.

सत्यराज यांची प्रकृती जरी खालावली असली तरीदेखील याविषयी त्यांच्याकडून वा त्यांच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यात कोविडची गंभीर लक्षण असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास वेळ लागत आहे.

Baahubali फेम कटप्पाची लेक आहे प्रचंड हॉट; फोटो पाहून अनेक जण होतायेत क्लीन बोल्ड

दरम्यान, सत्यराज यांचा दाक्षिणात्य कलाविश्वात दबदबा आहे. त्यांनी १९७९ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. परंतु, 'बाहुबली' या चित्रपटात कटप्पा ही भूमिका साकारुन ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. तसंच 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटातही त्यांनी दिपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 

Web Title: katappa of baahubali aka sathyaraj deteriorated health hospitalized due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.