Kathua Rape Case : मेकअप करून कठुआ प्रकरणावर आवाज उठविणाऱ्या स्वरा भास्करवर यूजर्सची टीका!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 09:40 AM2018-04-14T09:40:08+5:302018-04-14T15:10:20+5:30

कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी सोशल मीडियावर तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बॉलिवूडमधूनही रोष व्यक्त केला ...

Kathua Rape Case: The criticism of the user on making voice on the Kadua issue by making make-up! | Kathua Rape Case : मेकअप करून कठुआ प्रकरणावर आवाज उठविणाऱ्या स्वरा भास्करवर यूजर्सची टीका!

Kathua Rape Case : मेकअप करून कठुआ प्रकरणावर आवाज उठविणाऱ्या स्वरा भास्करवर यूजर्सची टीका!

googlenewsNext
ुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी सोशल मीडियावर तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बॉलिवूडमधूनही रोष व्यक्त केला जात आहे. अशात एक यूजरने अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यावर निशाणा साधला आहे. यूजरने स्वरा भास्करच्या मेकअपवाल्या फोटोवरून तिच्यावर टीका केली. या फोटोमध्ये स्वरा एक पोस्टर हातात घेऊन विरोध करताना दिसत आहे. स्वराच्या या ट्विटला श्रुती सेठ नावाच्या यूजरने रिट्विट केले, ज्यास चांदनी सेठिया नावाच्या यूजरने आक्षेप घेतला. चांदनीने लिहिले की, ‘श्रुती कृपया तू स्वराला याविषयी विचारणार काय की अशाप्रकारच्या संवेदनशील मुद्द्यांवर बोलण्यासाठी मेकअपची काय आवश्यकता आहे? मला असे वाटले की, हे कलाकार रिल आणि रिअल लाइफमध्ये अंतर मानत असावेत.’ चांदनीच्या या प्रश्नावर स्वराने अतिशय वैचारिकदृष्ट्या उत्तर दिले. तसेच तिच्या मेकअपवाल्या फोटोमागचे वास्तव सांगितले. 

ALSO READ : Kathua Rape Case : बॉलिवूडमध्ये तीव्र संताप; म्हटले, ‘अखेर देव कुठे आहे?’

स्वराने उत्तरात लिहिले की, ‘चांदनी, मेकअपची आवश्यकता त्यामुळे होते जेव्हा मी शूटिंग करीत होती. तुला कदाचित माहीत असेल की त्यास आम्ही काम असे म्हणतो. मला तुला असे विचारायचे आहे की, जे लोक मेकअप करतात ते अशाप्रकारच्या मुद्द्यांवर आवाज उठवू शकत नाहीत काय? आपले विचार मांडण्याचा त्यांना अधिकार नाही काय? तुला नेमका त्रास कशामुळे होत आहे?’ स्वराच्या या रोखठोक उत्तरानंतर चांदनीने तिला कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. कठुआ येथे एका आठ वर्षीय चिमुकलीवर अतिशय अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध स्तरातून विरोध दर्शविला जात आहे. बॉलिवूडमध्ये नराधमांना फाशीच द्यावी, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी सेलिब्रिटी आपापल्या पद्धतीने त्याचा विरोध दर्शवित आहेत.  
 }}}} ">The need for make up was because I was right in the middle of a shoot Chandni.. you know that thing called WORK.. But why is that important? People who wear make up cannot take up for a cause? Don’t have the right to express their opinion? What’s bothering you? https://t.co/Z7X9gMSo5Y— Swara Bhasker (@ReallySwara) April 13, 2018
दरम्यान, स्वरा भास्कर अगोदर बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींनी आपला संताप व्यक्त करताना देशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. यामध्ये फरहान अख्तर, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, ट्विंकल खन्ना, सोनम कपूर, आदी सेलिब्रिटींनी आपला रोष व्यक्त केला. त्याचबरोबर क्रीडा जगतातूनही या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. 

Web Title: Kathua Rape Case: The criticism of the user on making voice on the Kadua issue by making make-up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.