ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! कतरिनाने मोडला व्हॉट्सॲप चॅनलचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 03:02 PM2023-09-29T15:02:04+5:302023-09-29T15:14:24+5:30

कतरिनाने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर 15 मिलीयन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे.

Katrina broke the record of WhatsApp channel | ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! कतरिनाने मोडला व्हॉट्सॲप चॅनलचा रेकॉर्ड

Katrina

googlenewsNext

कतरिना कैफव्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी बनली आहे. कतरिनाने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर 15 मिलीयन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. अगदी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग आणि गायक/रॅपर बॅड बनी यासारख्या जागतिक व्यक्तींना तिने मागे टाकलं.

कतरिना कैफ 13 सप्टेंबर रोजी चॅनल जॉईन केलं होतं. कॅटचे ​​सध्या तिच्या चॅनलवर 15 मिलीयन फॉलोअर्स आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर जगातील मोठ्या सेलिब्रिटींपेक्षा बॉलिवूड कलाकारांचे फॉलोअर्स जास्त आहेत. अक्षय कुमार आणि पीएम मोदींसह अनेक स्टार्सचे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करताच त्यांना लाखो फॉलोअर्स मिळालेत.

जगभरातील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये कतरिना कैफ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडे 25 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर नेटफ्लिक्स आहे. नेटफ्लिक्सकडे 17.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर  तिसऱ्या क्रमांकावर कतरिना आहे. तिच्याकडे 15.4 मिलीयन फॉलोअर्स आहेत. रिअल माद्रिद 15.1 मिलियन फॉलोअर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या स्थानावर गायक/रॅपर बॅड बनी हा आहे.

यंदा  WhatsApp Channel फिचर लाँच करण्यात आलं होतं. मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं हे फिचर भारतासह जगभरात रोल आऊट केलं. ह्या फिचरमुळे थेट, विश्वासू आणि खाजगी पद्धतीनं युजर्स आणि संस्था व्हॉट्सअ‍ॅप प्लॅटफॉर्मवर महत्वाच्या अपडेट्स देऊ शकतात. चॅनेल्स हे एकमार्गी ब्रॉडकास्टिंग टूल आहे, ज्याचा वापर करून अ‍ॅडमिन टेक्स्ट मेसेज, फोटोज, व्हिडीओज, स्टिकर्स आणि पोल्स पाठवू शकतात. युजर्सना त्यांच्या आवडीचे चॅनेल्स शोधता यावे म्हणून कंपनीनं एक सर्चेबल डीरेक्टरी बनवत आहे.

Web Title: Katrina broke the record of WhatsApp channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.