कॅटरिना ठरतेय का रणबीर-आदित्य यांच्या मैत्रीतील ‘विलेन’?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 02:07 PM2017-01-03T14:07:15+5:302017-01-03T14:07:15+5:30
कॅटरिना कैफ आणि आदित्य राय कपूर यांच्यातील मैत्री(मैत्री की त्यापलीकडे काही??) सध्या चांगलीच बहरतेय. पण कॅट व आदित्यच्या या ...
क टरिना कैफ आणि आदित्य राय कपूर यांच्यातील मैत्री(मैत्री की त्यापलीकडे काही??) सध्या चांगलीच बहरतेय. पण कॅट व आदित्यच्या या वाढत्या मैत्रीमुळे एक व्यक्ति प्रचंड अपसेट आहे. ही व्यक्ति कोण? हे तुम्ही ओळखले असेलच. होय, कॅटरिनाचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर. आपली एकेकाळची गर्लफ्रेन्ड दुस-या कुणासोबत कधी नव्हे इतकी फ्रेन्डली होतेय, म्हटल्यावर रणबीरचा जळफळाट साहजिकच म्हणायला हवा. खरे तर रणबीर केवळ कॅटरिनामुळेच नाही तर आदित्यमुळेही अपसेट आहे. कारण रणबीर व आदित्य आधीपासूनचे चांगले मित्र आहेत. पण अलीकडे आदित्य रणबीरला टाळून कॅटरिनाला जवळ करतोय. तुम्हाला आठवत असेलच, अलीकडे रणबीरच्या हाऊस वॉर्मिंगची पार्टी सोडून आदित्यने कॅटसोबत वेळ घालवणे पसंत केले होते. आताही आदित्य असेच वागतोय.
अगदी काल-परवा आदित्यने रणबीरसोबतची फुटबॉल पॅ्रक्टिस टाळली. आदित्य आणि रणबीर खार येथे फुटबॉल मॅचची प्रॅक्टिस करणार होते. रणबीर ठरल्यानुसार, याठिकाणी पोहोचला. पण आदित्य तिकडे फिरकलाच नाही. यामुळे रणबीर व आदित्यच्या मैत्रीतील कटुतेत आणखी भर पडली आहे. एकंदर काय तर एकेकाळचे हे दोन चांगले मित्र सध्या कॅटरिनामुळे दुरावू पाहत आहेत. कॅटरिना व रणबीरचा भूतकाळ आदित्यपासून लपून राहिलेला नव्हताच. पण अशातही आदित्यने कॅटरिनाला जवळ केले. केवळ कॅटरिनाला जवळच केले नाही तर तिच्यासाठी रणबीरला दूर केले. आता याला ‘लव्ह ट्रँगल’ म्हणायचे की आणखी काही, आम्हाला ठाऊक नाही. ते तुम्हीच ठरवलेले बरे. शिवाय कॅटरिनालाच रणबीर व आदित्यच्या दोस्तीतील खलनायक ठरवायचे की नाही, याचाही निर्णय तुमचाच!