सीक्रेट लोकेशनवर सुट्टी एन्जॉय करताहेत कतरिना कैफ आणि विकी कौशल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:52 PM2022-03-31T14:52:53+5:302022-03-31T14:53:23+5:30

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)च्या लग्नाला ९ एप्रिलला चार महिने पूर्ण होणार आहेत. लग्नाच्या चार महिन्यांपूर्वीच हे जोडपे एका सीक्रेट ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. व्हेकेशनच्या या फोटोंमध्ये विकी आणि कतरिना रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.

Katrina Kaif and Vicky Kaushal enjoy a holiday at a secret location | सीक्रेट लोकेशनवर सुट्टी एन्जॉय करताहेत कतरिना कैफ आणि विकी कौशल

सीक्रेट लोकेशनवर सुट्टी एन्जॉय करताहेत कतरिना कैफ आणि विकी कौशल

googlenewsNext

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या एकत्र सुट्टी एन्जॉय करत आहेत. या व्हॅकेशन्सचे कतरिनाने रोमँटिक फोटो शेअर केले आहेत ज्यात विकी कौशल तिच्या मांडीवर डोके ठेवून पडलेला दिसत आहे. विकी कौशल आणि कतरिना एकत्र हँगआउट करण्यासाठी कुठे गेले आहेत याबद्दल कोणालाच माहिती नाही. दोघांनीही त्यांचे हॉलिडे डेस्टिनेशन आतापर्यंत गुपित ठेवले आहे. त्यांच्या व्हॅकेशन्सचे फोटोतील बॅकग्राउंड खूपच सुंदर दिसते आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशलने त्यांच्या व्हॅकेशन्सचे तीन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत कतरिनाने बिकिनी घातलेली दिसत आहे आणि विकी कौशल तिच्या मांडीवर डोके ठेवून पडलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोत कतरिना बोटीवर पोज देताना दिसते आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये कतरिनाने झोपडीचा फोटो शेअर केला आहे. या झोपडीच्या आजूबाजूला एवढी हिरवळ आहे की ते दृश्य अतिशय सुंदर दिसते आहे.

कतरिना कैफने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर व्हॅकेशनचे हे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होतो आहे. या फोटोवर कुणी हार्ट इमोजी बनवले तर कुणी फायर आयकॉन शेअर केला.


यापूर्वी सोशल मीडियावर विकी आणि कतरिनाच्या व्हॅकेशनचा आणखी एका फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो विक्की कौशलने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत मावळत्या सूर्याची किरणे समुद्राच्या पाण्यावर पडताना दिसत असून त्यामुळे समुद्राच्या सौंदर्यात भर पडली आहे. हा फोटो समोर आल्यापासून चाहते त्याच्याकडे आणखी फोटोंची मागणी करत आहेत.

Web Title: Katrina Kaif and Vicky Kaushal enjoy a holiday at a secret location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.