कतरिना कैफने लग्नानंतर सासरच्या मंडळींसोबत साजरी केली पहिली रंगपंचमी, फोटोत बघा खास क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 14:47 IST2022-03-18T14:22:40+5:302022-03-18T14:47:47+5:30
चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या जगात या वर्षी असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे लग्नानंतरची पहिली रंगपचंमी साजरी करत आहेत.

कतरिना कैफने लग्नानंतर सासरच्या मंडळींसोबत साजरी केली पहिली रंगपंचमी, फोटोत बघा खास क्षण
चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या जगात या वर्षी असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे लग्नानंतरची पहिली रंगपंचमी साजरी करत आहेत. गेल्या एका वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले आणि यावर्षी ते त्यांच्या पत्नी किंवा पतीसोबत पहिली रंगपंचमी साजरी करत आहेत. या यादीत कतरिना आणि विकी कौशलचेही नाव आहे. विकी आणि कतरिना यांचा विवाह ९ डिसेंबर २०२१ रोजी झाला आणि लग्नानंतर दोघांची ही पहिली होळी आहे. विकी आणि कतरिनाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर रंगपंचमी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या सासरच्या मंडळींसोबत रंगपंचमी साजरी करताना दिसत आहे.
दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये विकी सेल्फी घेत आहे तर कतरिना त्याच्या सासूबाईंच्या मागे उभी आहे.कतरिना आणि विकीसोबत अभिनेत्याचे वडील शाम कौशल आणि भाऊ सनी कौशल देखील पोज देताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नानंतर विकी आणि कतरिना एकमेकांसोबत जास्त वेळ स्पेंट करु शकले नाहीत. कारण दोघेही आपआपल्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. मात्र आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडाफार वेळ ते काढत असतात. अलीकडेच ते धर्मा प्रॉडक्शनचा सीईओ अपूर्व मेहताच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाले होते. त्यावेळी सर्वांच्या नजरा विक्की कौशलवर होत्या. लोक फारच केअरिंग हसबंड म्हणत आहे. व्हिडीओत तो पत्नीच्या कंफर्टकडे लक्ष देताना दिसत आहे. लोक व्हिडीओवर मेड फॉर इच अदर सारख्या कमेंट्स करत आहेत.