विकी आणि कॅटच्या लग्नामुळे एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी नाराज ?, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 12:42 PM2021-12-08T12:42:41+5:302021-12-08T12:53:58+5:30

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : कतरिनाच्या आधी विकी हरलीन सेठीला डेट करत होता.

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding :Vicky-kaushal ex girlfriend harleen sethi shares cryptic post | विकी आणि कॅटच्या लग्नामुळे एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी नाराज ?, पोस्ट शेअर करत म्हणाली...

विकी आणि कॅटच्या लग्नामुळे एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी नाराज ?, पोस्ट शेअर करत म्हणाली...

googlenewsNext

या वर्षातील सगळ्यात शाही लग्नाची तयारी राजस्थानच्या माधोपूरमध्ये जोरात सुरु आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ  (Katrina Kaif) सध्या आपल्या लग्नाला घेऊन चांगलेच चर्चेत आहेत. ९ डिसेंबर रोजी कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. कतरिनाच्या आयुष्यात विकीआधी सलमान खान (Salman Khan) आणि रणबीर कपूर  (Ranbir Kapoor)  होता तर विकीचे अफेअर हरलीन सेठी (Harleen Sethi)सोबत होते.लग्नाला अवघ्या एक दिवस बाकी असताना विकीची एक्स ग्रर्लफ्रेंड हरलीन सेठीची (Harleen Sethi) पोस्ट व्हायरल झाली आहे. 

हरलीन सेठीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं. हरलीनने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले होतं, 'आयुष्याचा अर्थ सतत शोधणे म्हणजे टोस्टचा अर्थ शोधण्यासारखे आहे.कधी कधी अर्थ न शोधता फक्त टोस्ट खाणे चांगले असते.'' अर्थात हरलीनने ही पोस्ट शेअर करताना कोणाचाही उल्लेख केलेला नाही. मात्र नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की ही अभिनेत्रीने ही पोस्ट तिची एक्स बॉयफ्रेंड विकी कौशलसाठी पोस्ट केली. 

हरलीन आणि विकीचे 2019मध्ये ब्रेकअप झाले होते. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत हरलीन ब्रेकअपबद्दल बोलताना म्हणाली होती, खरे सांगू मला या गोष्टीचा अजिबात त्रास झाला नाही. मात्र माझे कुटुंब व मित्रांना खूप त्रास झाला. प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी ओळख असते. या गोष्टीमुळे मी स्वत:ला कमी लेखत नाही आहे. मी एका स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि मी आतापर्यंत एकही सिनेमा केलेला नाही यामुळे मी अजिबात स्वत:ला कमी लेखत नाही. मी स्वत:वर प्रेम करते. मला लोकांनी हरलीन सेठी म्हणूनच ओळखावे. त्यामुळे एखाद्याला माझा एक्स बॉयफ्रेंड म्हणणे चुकीचे ठरेल.
 

Web Title: Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding :Vicky-kaushal ex girlfriend harleen sethi shares cryptic post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.