Vicky Kaushal, Katrina Kaif : “क्या करू कंट्रोल नहीं होता...”, विकीच्या ‘या’ सवयीला वैतागली कतरिना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:05 PM2022-12-07T17:05:32+5:302022-12-07T17:05:54+5:30
Vicky Kaushal, Katrina Kaif : सोशल मीडियावर विकीला फॉलो करणाऱ्यांना त्याची एक सवय चांगलीच ठाऊक असेल.
2018 साली विकी कौशल (Vicky Kaushal ) करणच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये आला होता. यावेळी तुझी आणि कतरिना कैफची (Katrina Kaif) जोडी सुंदर दिसेल, असं करण म्हणाला म्हणाला. हे ऐकून विकी हातभर उडाला होता. पुढे विकी कतरिनात असा काही गुंतला की सांगायलाच नको. आता दोघंही आपल्या संसारात आनंदी आहेत. विकी जिथं जाईल तिथे बायकोचं कौतुक करत असतो. माझी बायको कतरिना खूपच प्रेम आहे. ती नेहमी खरं बोलते, आपल्या भूमिकेवर ठाम असते. तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. अगदी तिच्यासारखी बायको मिळाली म्हणून मी स्वत:ला नशीबवान मानतो, असं काय काय तो बोलतो. पण कतरिनाचं काय? विकी बायकोवर जाम खुश्श आहे. पण कतरिना मात्र नवरोबाच्या एका सवयीला जाम वैतागली आहे.
होय, नुकताच विकीने हा खुलासा केला. विकीने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने हा खुलासा केला आहे. माझी बायको माझ्या या एका सवयीमुळे वैतागली आहे. तिने लाख प्रयत्न केलेत पण विकी ही सवय गेली नाही, असं त्याने म्हटलं आहे. आता ही विकी कशाबद्दल बोलतोय तर ते जाणून घेऊ यात.
सोशल मीडियावर विकीला फॉलो करणाऱ्यांना विकीची एक सवय चांगलीच ठाऊक असेल. विकी अनेकदा पंजाबी गाण्यावर लिपसिंक करतानाचे डान्स व्हिडीओ शेअर करत असतो. विकीची हीच गोष्ट कतरिनाला आवडत नाही. ‘असे व्हिडीओ अपलोड करू नकोस, अशी विनंती माझी पत्नी मला करत असते. पण मी कंट्रोल करू शकत नाही. एक दिवस ती सुद्धा माझं कौतुक करेल, अशी आशा करतो, ’असं विकीने असाच एक व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफने धूमधडाक्यात लग्न झालं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर सर्च केले जातात. कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. तिचा ‘फोन भूत’ हा सिनेमा गेल्या महिन्यातच प्रदर्शित झाला. विकीचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा सिनेमा येत्या 16 डिसेंबरला डिज्नी प्लस हॉट स्टारवर रिलीज होतोय. या चित्रपटात विकीसोबत कियारा अडवाणी व भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.