कॅटरिना कैफ बनणार कपिल देवची पत्नी; पहिल्यांदाच झळकणार 'ही' जोडी !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 01:13 PM2017-10-04T13:13:01+5:302017-10-04T18:43:01+5:30
गेल्यावर्षी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एका विक्रमवीर माजी कर्णधारावर ...
ग ल्यावर्षी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एका विक्रमवीर माजी कर्णधारावर आधारित बायोपिकची निर्मिती केली जात आहे. होय कपिल देव यांच्यावर ही बायोपिक असणार आहे. चित्रपटाची कथा १९८३ मध्ये भारताला मिळवून दिलेल्या वर्ल्डकपवर आधारित असेल. दरम्यान, चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार असल्याचे याअगोदरच निश्चित झाले असून, कपिल देवच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ झळकणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रणबीर आणि कॅटरिनाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
‘बजरंगी भाईजान’ आणि ‘टायगर जिंदा है’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे कबिर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगची भूमिका खूपच चॅलेजिंग असणार आहे. कारण तो टीम इंडियाच्या कर्णधाराची भूमिका साकारणार आहे. रणवीरच्या अपोझिट कॅटरिना कैफ कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारणार आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या बातमीनुसार कॅटरिना या भूमिकेसाठी खूपच उत्साहित आहे. शिवाय दिग्दर्शक कबीर खान यांनादेखील कॅटरिना या भूमिकेसाठी एकदम फिट वाटत असल्याने तिचे नाव निश्चित समजले जात आहे.
असे म्हटले जाते की, कपिल देव यांच्या यशात त्यांची पत्नी रोमीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे कॅटरिनाला रोमी यांची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक असणार आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजला १८१ धावांनी पराभूत करीत वर्ल्डकप जिंकला होता. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक होता. कपिल देव यांनी कर्णधारपद भूषविताना संघाचे संतुलनदेखील त्याकाळी योग्यरीत्या जमविले होते. शिवाय त्याकाळी ते क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाले होते. कपिल देव यांनी १९७८ ते १९९४ दरम्यान भारतीय क्रिकेट संघात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली.
दरम्यान, याविषयी कपिल देव यांनी सांगितले की, ‘जेव्हा मी खेळायला सुरुवात केली होती तेव्हा बहुतांश क्रिकेटपटू इंग्रजीमध्ये संवाद साधायचे. मला जेव्हा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा अनेकांनी माझ्या इंग्रजी भाषा येण्यावरून प्रश्न उपस्थित केले. तेव्हा मी सांगितले होते की, तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी कोणाला तरी आॅक्सफोर्डमधून घेऊन या मी क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करतो. अशा अनेक प्रसंगांचा सामना करून कपिल देव यांनी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले. हा सर्व प्रवास आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघावयास मिळणार आहे.