Birthday Special : - तर बॉलिवूडमध्ये आलीच नसती कॅटरिना कैफ !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 07:32 AM2018-07-16T07:32:15+5:302018-07-16T07:32:15+5:30

कॅट बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिला बरेच नकार पचवावे लागलेत. अनेकांनी तिच्या अभिनयावर टीका केली तर अनेकांनी तिला नाचता येत नाही म्हणून, नाकं मुरडली.

Katrina Kaif Birthday Special Katrina Kaif LIFE FACTS | Birthday Special : - तर बॉलिवूडमध्ये आलीच नसती कॅटरिना कैफ !

Birthday Special : - तर बॉलिवूडमध्ये आलीच नसती कॅटरिना कैफ !

सिंग इज किंग,वेलकम, एक था टायगर, जब तक है जान, अगदी अलीकडचा टायगर जिंदा है यासारखे अनेक हिट चित्रपट देणारी ग्लॅम डॉल म्हणजेच कॅटरिना कैफ. आज कॅटरिना कैफचा(१६ जुलै) वाढदिवस. १९८४ मध्ये आजच्याच दिवशी हाँगकाँगमध्ये तिचा जन्म झाला होता. भारतीय वंशाचे मोहम्मद कैफ आणि ब्रिटिश वंशाची सुजैन टरकोट यांच्या पोटी जन्मलेल्या कॅटरिनाला लहानपणापासूनच ग्लॅमरचे जग खुणवत होते. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी तिने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि बघता बघता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंतचा पल्ला गाठला.

बॉलिवूडमध्ये नवखी असताना कॅटरिनाला हिंदी बोलता येत नव्हते. तिचा अभिनयही सुमार होता. हिंदी येत नाही, त्यात अभिनयाची बोंब. त्यामुळे त्याकाळात तिची बरीच खिल्ली उडवली गेली. हिंदीचं नाही तर अभिनयही न येणारी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टिकणारचं नाही, असे भाकित त्याकाळी अनेकांनी वर्तवले.  तिला बरेच नकार पचवावे लागलेत. अनेकांनी तिच्या अभिनयावर टीका केली तर अनेकांनी तिला नाचता येत नाही म्हणून, नाकं मुरडली. तिच्या हिंदीबद्दलही लोक नाही नाही ते बोललेतं. पण कॅटरिना जिगरबाज निघाली. तिने ही सगळी टीका पचवत, स्वत:ची अशी काही ओळख निर्माण केली की, लोकांची तोंड बंद झालीत. आज कॅटचे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ते म्हणूनच.

करिअरच्या सुरूवातीला तिने काही मल्याळम चित्रपटात काम करावे लागले. २००४ मध्ये मल्लीस्वरी आणि २००५ मध्ये आलेल्या अलारी पेडगू या मल्याळम चित्रपटात कॅटरिना दिसली.

२००३ मध्ये दिग्दर्शक कायजाद गुस्ताद यांनी कॅटरिनाला एका फॅशन शोमध्ये बघितले नसते तर कदाचित ती बॉलिवूडमध्ये आलीच नसती. या फॅशन शोमध्ये कॅटरिनाला पाहून कायजाद गुस्ताद यांनी तिला ‘बूम’ या चित्रपटात कास्ट केले.

दुसऱ्या वर्षी कॅटरिना सलमान खानच्या डोळ्यात भरली. ‘मैंने प्यार क्यों किया’मध्ये त्याने तिला कास्ट केले आणि हळूहळू सलमान व कॅटमधील जवळीक वाढली. पुढे तर सलमाननेच कॅटरिनाचे करिअर घडवले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कॅटरिनाच्या करिअरमध्ये सलमानचा मोठा वाटा आहे. खुद्द कॅटनेही अनेक मुलाखतीत हे कबुल केले आहे.

सलमान व कॅटरिनाच्या नात्याची चर्चा होत असताना अचानक कॅटरिनाच्या आयुष्यात रणबीर कपूर नावाचे वादळ आले. रणबीरसाठी कॅटरिनाने सलमानला सोडले. रणबीरच्या प्रेमात ती इतकी वेडी झाली होती की, त्याच्यासोबत लिव्ह इनमध्येही राहू लागली. पण हे प्रेम ऐन बहरात असतानांच अगदी अनपेक्षित या दोघांचेही ब्रेकअप झाले. या ब्रेकअपमागे रणबीरची आई नीतू कपूर कारणीभूत होती, असे मानले जाते. या बे्रकअपमधून सावरणे कॅटरिनाला बरेच कठीण गेले. पण याकाळातही सलमान तिच्या मदतीला धावून आला.

 

Web Title: Katrina Kaif Birthday Special Katrina Kaif LIFE FACTS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.