'भारत'चे शूटिंग पूर्ण, कतरिना कैफने सलमान खानसोबतचा शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 17:17 IST2019-03-05T17:17:05+5:302019-03-05T17:17:39+5:30
बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट भारतबाबत त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतेच 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

salman khans' bharat movie update
बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट भारतबाबत त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतेच 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. कतरिना कैफनेसलमान खानसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि या फोटोला स्पेशल कॅप्शन दिले आहे.
सलमान खानसोबतचा फोटो शेअर करीत कतरिनाने लिहिले की, 'भारत'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. माझ्यासाठी हे खूप इंटरेस्टिंग भूमिका होती. चित्रपट बनण्याची पूर्ण प्रोसेस खूप प्रेरणादायी होती. यासोबतच अली अब्बास जफर, सलमान खान व अतुल अग्निहोत्री बेस्ट बॉइज व अलवीरा खान बेस्ट गर्ल असे लिहित आभारही मानलेत.
'भारत' चित्रपटासाठी कतरिना कैफ पहिली पसंती नव्हती तर तिच्या जागी प्रियंका चोप्राला घेण्यात आले होते. मात्र प्रियंकाने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर तिच्या जागी कतरिनाची वर्णी लागली.
ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.
'भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़ म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़ प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात.