शूटींगआधी कतरिना कैफची कोरोना टेस्ट, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 15:16 IST2020-11-23T15:12:43+5:302020-11-23T15:16:54+5:30
शूटींगआधी कतरिना कैफने कोरोना टेस्ट केली. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.

शूटींगआधी कतरिना कैफची कोरोना टेस्ट, व्हिडीओ झाला व्हायरल
कतरिना कैफ आता लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच शूटींगवर परतणार आहे आणि पूर्ण सावधानता बाळगून येणार आहे. कतरिना नुकतीच आपल्या टीमसोबत शूटींगनंतर मालदीव्सहून परतली. त्यानंतर तिने फॅन्ससाठी काही फोटोज आणि व्हिडीओ शेअर केलेत. शूटींगआधी कतरिना कैफने कोरोना टेस्ट केली. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.
व्हिडिओ शेअर करत कतरिनाने लिहिलं की, 'हे करायला पाहिजे. शूटसाठी टेस्टींग. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टेस्ट करत असलेल्या मेडिकल प्रोफेशनलने पीपीई किट घातली आहे आणि पूर्ण काळजी घेत आहे.
कतरिना कैफने प्रोफेशनल लाइफमध्ये अनेक चढ-उतार बघितले आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यावर ती फार त्रासात होती. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यावर ती आणखी मजबूत झाली. सोबतच कतरिनाने हेही सांगितलं की, ब्रेकअपनंतर दोघेही एकमेकांचा सन्मान करतो. कतरिनाची फॅन फॉलोईंग मोठी आहे. कतरिना नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तशी ती आता यापुढेही राहणार आहे.