"मला समोर मृत्यू दिसत होता..." कतरिना कैफला आलेला भयावह अनुभव, म्हणाली, 'एकच इच्छा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 12:24 PM2023-11-26T12:24:50+5:302023-11-26T12:26:00+5:30
मृत्यूला आपल्या समोर बघणं म्हणजे काय याचा अनुभव अभिनेत्री कतरिना कैफला आला.
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या 'टायगर 3' (Tiger 3) च्या यशाचा आनंद घेत आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या यशानंतर हा तिसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. आतापर्यंत सिनेमाने ४०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. कतरिना कैफच्या जोया या गाजलेल्या भूमिकेचं याही सिनेमातून कौतुक होतंय. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने कतरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये तिने एका भयानक अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
मृत्यूला आपल्या समोर बघणं म्हणजे काय याचा अनुभव अभिनेत्री कतरिना कैफला आला. एका मुलाखतीत ती म्हणाली, 'एकदा मी चॉपरवर होते. अचानक हवेमुळे चॉपर अशांत झाले. तेव्हा मला जाणवलं की मृत्यू माझ्यासमोर उभा आहे. मला आठवतं तेव्हा मी फक्त एकच आशा करत होते की माझी आई ठीक असावी. तेव्हा माझा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.'
कतरिना बॉलिवूडमध्ये १५ वर्षांपासून आहे. सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासोबतचे तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तसंच तिला बॉलिवूडमध्ये सर्वात फिट अभिनेत्री म्हणूनही ओळखलं जातं. टायगर 3 च्या यशानंतर ती खूप खूश असल्याचंही तिने यावेळी सांगितलं.
कतरिनाचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमाही १२ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. यामध्ये तिने साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतिसोबत काम केलं आहे. 'अंधाधुन' फेम श्रीराम राघवन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.