कतरिना कैफकडे 'गुडन्यूज'? नव्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बंप!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 03:21 PM2023-11-17T15:21:44+5:302023-11-17T15:24:16+5:30
कतरिनाचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कतरिना आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबद्दल कतरिनाने आणि अभिनेता विकी कौशलने कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र, यातच कतरिनाचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कतरिना कैफचा 'टायगर 3' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यातच कतरिनाचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात कतरिना कॅज्युअल लूकमध्ये पाहायला मिळाली. ती ओव्हरसाईज डेनिम जॅकेटमध्ये दिसली. यावेळी चाहत्यांनी कतरिना गरोदर असल्याचा कयास लावला आहे. एका चाहत्याने लिहिले, कतरिना गरोदर आहे का? तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ती गरोदर दिसत आहे. ती खूप सावधपणे चालत आहे आणि असे दिसते की तीन महिने उलटून गेले आहेत.
यापूर्वीही काही दिवस कतरिना माध्यमांपासून लांब राहिली होती. तेव्हा कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ती जाणूनबुजून माध्यमांपासून आणि पापाराझींपासून दूर राहतेय, असं म्हटलं जात होतं. पण ती माध्यमांसमोर आल्यावर चर्चांना पुर्णविराम लागला होता. आता पुन्हा अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशलने डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला होता.