कतरिना कैफने अखेर मान्य केले की ती आहे रिलेशनशीपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 17:50 IST2018-10-09T17:49:23+5:302018-10-09T17:50:07+5:30
कतरिना कैफने आपल्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल खुलासा केला.

कतरिना कैफने अखेर मान्य केले की ती आहे रिलेशनशीपमध्ये
बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ सलमान खानच्या प्रोडक्शन अंतर्गत बनत असलेला चित्रपट 'भारत'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे सध्या ती चित्रीकरण करत आहेत. कतरिना कैफने नेहा धुपियाचा शो फिल्टर नेहा सीझन 3मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कतरिना कैफने आपल्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल खुलासा केला.
कतरिना कैफने आतापर्यंत सलमान खान व रणबीर कपूरला डेट केले आहे. तिला रिलेशनशीपबद्दल विचारले असता तिने बिंधास्त कबुली दिली. तिने कोणाच्या तरी प्रेमात असल्याचे म्हणजेच रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले. कतरिनाचे चाहते तो व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार कतरिनाला तिच्या रिलेशनशीपबद्दल विचारले असता तिने मजेशीर उत्तर दिले. ती म्हणाली की, मी माझ्या रिलेशनशीपबद्दल सांगते. मी माझ्या कपड्यांसोबत रिलेशनशीपमध्ये असून मी त्याबाबतीत खूप भावनिक आहे. माझे नाते ट्रॅकसूट, स्वैटपॅन्ट्स व ट्रॅक पँट यांच्यासोबत आहे आणि याची फॅशन पुन्हा आली आहे. या सर्व गोष्टी कुणीतरी मला गिफ्ट म्हणून दिल्या पाहिजेत. मला ट्रॅक पँट खूप आवडतात. माझे कपड्यांवर मनापासून प्रेम आहे.
कतरिना कैफच्या नात्याबद्दल ऐकण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक होते. मात्र तिच्या उत्तराने नक्कीच तिच्या युवक चाहत्यांना दिलासा मिळाला असेल. कतरिना कैफ व सलमान खान यांचा आगामी सिनेमा भारतमध्ये या दोघांव्यतिरिक्त दिशा पटानी, नोरा फतेही व सुनील ग्रोवर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.