सून असावी तर अशी! सासरी जाताच कतरिना कैफने पती विकीसाठी बनवली ही खास डिश, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 02:21 PM2021-12-17T14:21:09+5:302021-12-17T14:31:34+5:30
विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्ना (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding) नंतर त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्ना (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding) नंतर त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. कतरिनाने आपल्या नवीन घरात पती आणि कुटुंबातील नवीन सदस्यांसाठी गोड पदार्थ तयार केला आहे. त्याचा एक फोटो त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने हा गोड पदार्थ स्वतः बनवला असल्याचे सांगितले. या फोटोत तिने रवाचा शिरा भरलेली वाटी हातात घेतल्याचे तुम्हाला दिसेल. मागून बाल्कनीतून आणि दूरवरची दृश्ये दिसतात. कतरिना कैफ (Katrina Kaif First Rasoi Photos) ने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'मी बनवले' असे लिहिले आहे.कतरिनाने रव्याचा हलवा बनवला आहे. विकीच्या घरात या विधीला 'चौका चारधाना' म्हणतात, असे तिने सांगितले आहे. कतरिना-विकी नुकतेच हनीमून परतले आहेत. दोघेही आता वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत.
विकी कौशल ( Vicky Kaushal) कतरिना कैफ (Katrina Kaif) शाही विवाह आणि मालदीवमध्ये हनीमूनच्या सुट्टीनंतर दोघेही मुंबईत परतले आहेत. वर्क कमिटमेंट आणि वेडिंग रिसेप्शन पार्टीसाठी तो हनिमूनहून लवकर परतल्याचे बोलले जात आहे. आता दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरू केली आहे. या दोघांच्या जवळच्या सूत्राने बॉलिवूड लाईफला सांगितले की, विकी आणि कतरिना संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसाठी एका भव्य रिसेप्शन पार्टीची तयारी करत आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ 20 डिसेंबरला त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी देत आहेत. ही तारीख निवडण्याची अनेक कारणे आहेत. असे म्हटले जात आहे की विकी आणि कतरिना दोघांनाही त्यांच्या कामावर परतण्यापूर्वी लग्नाचे सर्व विधी करायचे आहेत.