Katrina Kaif पापाराझीवर चांगलीच भडकली, म्हणाली - जर तुम्ही...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 05:53 PM2022-11-19T17:53:36+5:302022-11-19T18:29:40+5:30
कतरिनाने आधी कारचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ती पापाराझींवर भडकली.
कतरिना कैफ (Katrina Kaif) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या टॅलेंट आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे कतरिनाने इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. कतरिनाच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून चाहत्यांना ही आनंद होतो. पण आजकाल अभिनेत्रीचा मूड काहीसा ठीक नाहीय. त्यामुळे ती पापाराझींवर नाराज झालीय.
कतरिना पापाराझींवर झाला नाराज
कतरिना कैफची एक झलक आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पापाराझी नेहमी उत्सुक असतात. 18 नोव्हेंबरलाही कतरिना घराबाहेर पडली तेव्हा पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. पण अभिनेत्रीला पापाराझींची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. कतरिना जिममधून बाहेर आली होती. जेव्हा पापाराझीने तिची कार पाहिली त्यांनी कतरिनाला थांबण्यास सांगितले.
हे ऐकून कतरिनाने आधी कारचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ती रागाने म्हणाली, 'तुम्ही कॅमेरा आधी खाली करा. मी इकडे एक्ससाईज करायला येते. कॅमेरा खाली ठेवा. कतरिनाचा राग पाहून पापाराझींनी लगेच तिला सॉरी म्हटले. कतरिनाने काळ्या रंगाचा आउटफिटमध्ये होते आणि तिनं चेहऱ्यावर मास्क लावला होता. कतरिना कैफने पापाराझींवर नाराज होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल.
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफने मुलाखतीत सांगितले की, साया चित्रपटातील एक शॉट दिल्यानंतर तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आले. ती रडत होती आणि तिला सांगण्यात आले की ती अभिनेत्री बनू शकत नाही, तिच्यामध्ये काहीही चांगले नाही. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत कतरिना म्हणाली, 'मला साया नावाच्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. काढले पेक्षा रिप्लेस केले असे म्हणायला हवे होते. या चित्रपटाची निर्मिती अनुराग बासू यांनी केली होती आणि त्यात जॉन अब्राहम आणि तारा शर्मा यांनी भूमिका केल्या होत्या.
कतरिना कैफने २००३ साली बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर ती राजकारण, टायगर जिंदा है, झिरो, जब तक है जान, अजब प्रेम की गज़ब कहानी आणि नमस्ते लंडनमध्ये दिसला. सायाबद्दल बोलायचे तर हा एक काल्पनिक रोमान्स चित्रपट होता. ड्रॅगनफ्लाय या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते आणि महेश भट यांनी निर्मिती केली होती. कतरिना लवकरच जी ले जरा या चित्रपटात दिसणार आहे. तिचा फोन भूत हा चित्रपटही ४ नोव्हेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.