'टायगर 3' मधील डॅशिंग लूक आणि अ‍ॅक्शनसाठी कतरिनाने घेतली कठोर मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 03:19 PM2023-11-06T15:19:25+5:302023-11-06T15:23:26+5:30

'टायगर 3’ मध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचाही अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे.

Katrina Kaif gives peek into intense training regimen for Salman Khan's Tiger 3 | 'टायगर 3' मधील डॅशिंग लूक आणि अ‍ॅक्शनसाठी कतरिनाने घेतली कठोर मेहनत

'टायगर 3' मधील डॅशिंग लूक आणि अ‍ॅक्शनसाठी कतरिनाने घेतली कठोर मेहनत

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'टायगर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'टायगर 3’ मध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचाही अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे. 'एक था टायगर' किंवा 'टायगर जिंदा है' सिनेमात कतरिनाने साकारलेल्या झोयाच्या भूमिकेला प्रेम मिळाले. त्यामुळे आता 'टायगर 3' मध्ये कतरिनाला पुन्हा एकदा झोयाच्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

या चित्रपटात स्टंट करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. याचे काही व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कतरिना कैफने इंस्टाग्रामवर 5 व्हिडिओ शेअर केले आहेत.कतरिना पहिल्या व्हिडीओमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती स्टंटची रिहर्सल करताना दिसत आहे. तिसर्‍या आणि चौथ्या व्हिडीओमध्येही कतरिना तिच्या फिटनेसवर मेहनत करताना दिसत आहे.

कतरिनाने पोस्टमध्ये लिहिले, "वेदना ही फक्त दुसरी संवेदना आहे. घाबरू नका, वेदनापासून पळू नका. काम नेहमीच मोलाचे असते. लवकरच टायगर ३ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासाठी मी थोडी नर्व्हस आणि उत्साही आहे'.  या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'टायगर 3' हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टायगर-3 हा यशराज स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. टायगर मालिकेतील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी 2012 मध्ये 'एक था टायगर' आणि 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. तर शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा एक कॅमिओ यामध्ये असणार आहे. 

Web Title: Katrina Kaif gives peek into intense training regimen for Salman Khan's Tiger 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.