समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली Katrina Kaif, लग्नानंतरच्या हॉट फोटोंवर फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 07:01 PM2022-01-24T19:01:51+5:302022-01-24T19:03:10+5:30

Katrina kaif : लग्नानंतर पहिल्यांदाच तिने अशाप्रकारचे फोटो शेअर केले आहेत. यातील तिच्या क्यूट स्माइलने फॅन्सचं मन जिंकलं आहे.

Katrina Kaif hot look in tranparent shirt share photos from the Maldives beach | समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली Katrina Kaif, लग्नानंतरच्या हॉट फोटोंवर फॅन्स झाले फिदा

समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली Katrina Kaif, लग्नानंतरच्या हॉट फोटोंवर फॅन्स झाले फिदा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सोशल मीडियावर चांगली अॅक्विट असते. ती तिच्या फॅन्ससाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता कतरिनाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. जे फॅन्सना फारच आवडले. लग्नानंतर पहिल्यांदाच तिने अशाप्रकारचे फोटो शेअर केले आहेत. यातील तिच्या क्यूट स्माइलने फॅन्सचं मन जिंकलं आहे.

फोटोजमध्ये कतरिना कैफ समुद्र किनारी असल्याचं दिसत आहे. तिने ग्रीन कलरचा ट्रान्सपरन्ट शर्ट घातला आहे, ज्यात ती फारच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. त्यासोबच ती मॅचिंग कलरच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. हवेने तिचे केस उडत आहे आणि ती कॅमेराकडे बघून क्यूट स्माइल देत आहे. ज्यावर फॅन्स फिदा झाले आहेत. 

कतरिनाने तिचे हे हॉट आणि क्यूट फोटो तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. याच्या कॅप्शनला तिने लिहिलंय, 'माझं आवडतं ठिकाणी'. या फोटोवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, जर क्यूट असणं क्राइम असेल तर तू तुरूंगात असतील. एकाने लिहिलं की, खरंच जहर दिसत आहे मॅम. 

कतरिना कैफ पती विक्की कौशलला भेटायला इंदुरमध्ये गेली होती. जिथे तो त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे. कतरिनाने विक्की कौशलसोबत ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये लग्न केलं होतं. यात अनेक सेलिब्रिटींसहीत नातेवाईक सहभागी झाले होते.  

कतरिना कैफच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं तर ती 'टायगर ३' मध्ये दिसणार आहे. यात ती सलमान खान आणि इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच कतरिना 'फोन भूत' सिनेमातही दिसणार आहे. यात ती ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे.
 

Web Title: Katrina Kaif hot look in tranparent shirt share photos from the Maldives beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.