कतरिनाचा पती विकी कधीकाळी राहायचा 10 बाय 10च्या घरात, आज एका सिनेमासाठी घेतो इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 07:04 PM2021-12-15T19:04:01+5:302021-12-15T19:10:55+5:30

विकी कौशल (Vicky Kaushal)ने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे.

Katrina Kaif husband Vicky Kaushal charge 3 to 4 cr for a one film | कतरिनाचा पती विकी कधीकाळी राहायचा 10 बाय 10च्या घरात, आज एका सिनेमासाठी घेतो इतके कोटी

कतरिनाचा पती विकी कधीकाळी राहायचा 10 बाय 10च्या घरात, आज एका सिनेमासाठी घेतो इतके कोटी

googlenewsNext

कतरिना कैफ (Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal) हे लव्हबर्ड्स गेल्या 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. दोघांनी राजस्थानमधील बरवाडा येथील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट येथे अगदी शाही थाटामाटात लग्न केलं. राजस्थानमध्ये रॉयल स्टाईल डेस्टिनेशन वेडिंगचे अनेक फोटो विकी व कतरिनाने शेअर केले आहेत. मेहंदीपासून हळद ते शाही पॅलेसमधील रॉयल फोटोशूटपर्यंतच्या त्यांच्या फोटोंची सध्या जाम चर्चा आहे.लवकरच दोघे मुंबईत ग्रँड रिसेप्शन मुंबईत देणार आहे. या बॉलिवूडच्या अनेक स्टार्सने निमंत्रित केले आहे. 

आज विकीचे नेटवर्थ 25 कोटी आहे तो एका सिनेमात काम करायचे 3 ते 4 कोटी घेतो. असं जरी असले तर लहानपणी तो  मालाडमध्ये 10 बाय 10 च्या घरात तो राहात होता. त्याचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंटमॅन होते. विकीने राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इंजनिअरिंगची पदवी घेतली आहे. एका मुलाखतीत दरम्यान त्याने सांगितले होते की, माझा जन्म झाला त्यावेळी माझे वडील चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर होते. मला पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते प्रचंड खूश झाले होते. मी लहानपणापासून अभ्यासात हुशार होतो.

रमण राघव, मनमर्जिया, संजू, राझी आणि उरीः द सर्जिकल स्ट्राईक, भूत या सगळ्याच विकीच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट तिकिटबारीवर देखील यशस्वी ठरले आहेत. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

Web Title: Katrina Kaif husband Vicky Kaushal charge 3 to 4 cr for a one film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.