कतरिना कैफ लाइमलाइटपासून स्वतःला ठेवतेय दूर, मोठं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 06:23 PM2023-05-03T18:23:18+5:302023-05-03T18:23:45+5:30
Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली नाही. ही अभिनेत्री शेवटची 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली नाही. ही अभिनेत्री शेवटची 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती. यासोबतच कतरिना कैफने लग्नानंतर सार्वजनिक ठिकाणी येणे कमी केले आहे, त्यामुळे तिचे चाहते सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारत आहेत. हल्लीच ईदच्या मुहूर्तावर आयुष शर्मा आणि अर्पिता खानच्या घरी तिने हजेरी लावली होती, त्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरु लागल्या. यासोबतच असे म्हटले जात होते की, प्रेग्नेंसीमुळे अभिनेत्रीने सार्वजनिक ठिकाणी येणे कमी केले आहे.
खरेतर, कतरिनाने प्रेग्नेंसी किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे नव्हे तर तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले आहे. होय, एका मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'टायगर ३'मध्ये खूप व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटामुळे, तिने सार्वजनिक ठिकाणावर जाणे बंद केले आहे. जेणेकरून प्रेक्षकांना थिएटरमध्ये तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता राहील.
'टायगर ३' साठी कतरिनाने खूप मेहनत घेत आहे जेणेकरून ती तिच्या चाहत्यांना चकित करू शकेल. कतरिना शेवटची 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटला.