Katrina Kaif 'या' एका अटीवर Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, अट वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:39 PM2022-07-16T13:39:27+5:302022-07-16T13:53:15+5:30

बॉलिवूडचे स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत त्यांची लाइफ एन्जॉय करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का कतरिनाला लग्नासाठी तयार करणं इतकं सोपं नव्हते.

Katrina Kaif is ready to marry Vicky Kaushal on 'this' condition | Katrina Kaif 'या' एका अटीवर Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, अट वाचून व्हाल हैराण

Katrina Kaif 'या' एका अटीवर Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, अट वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) आज आपला बर्थ डे सेलिब्रेट करतेय. विकी कौशल(Vicky Kaushal) सोबत ती मालदीवमध्ये आपला वाढदिवस सेलिब्रेट करतेय. बॉलिवूडचे स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत त्यांची लाइफ एन्जॉय करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का कतरिनाला लग्नासाठी तयार करणं इतकं सोपं नव्हते. कतरिनाने लग्नापूरर्वी विकीपुढे एक अट ठेवली होती.

कतरिना कैफ (Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal) हे लव्हबर्ड्सने गेल्यावर्षी 9 डिसेंबरला लग्नगाठ बांधली.  दोघांनी राजस्थानमधील बरवाडा येथील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट येथे अगदी शाही थाटामाटात लग्न केलं. राजस्थानमध्ये रॉयल स्टाईल डेस्टिनेशन वेडिंगचे फोटो व्हायरल झाले होते. मेहंदीपासून हळद ते शाही पॅलेसमधील रॉयल फोटोशूटपर्यंतच्या त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा देखील झाली. 

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने हो म्हणेपर्यंत विकी तिला लग्नासाठी तयार करत राहिला. पण कतरिनाने लग्नासाठी विकीसमोर एक खास अट ठेवली होती. कतरिनाने विकीला सांगितले की, तिची आई, बहिणी आणि संपूर्ण कुटुंबावर तिच्यावर करतो तसं प्रेम करावं लागेल.

कतरिनाच्या बहिणी आणि भावासोबत विकीचे चांगले बॉन्डिंग आहे. त्यांच्यात चांगली मैत्री झाली आहे. हे पाहून कतरिनाही खूप खूश आहे. रिपोर्टनुसार, कतरिनाची भावंडं लग्नाआधी विकीला भेटलीही नव्हती. पण आता त्यांच्यातील बॉन्डिंग पाहून असे वाटते की जणू ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात.
 

Web Title: Katrina Kaif is ready to marry Vicky Kaushal on 'this' condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.