'भारत' चित्रपटाच्या शूटिंगसाठी कतरिना कैफ माल्टाला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:34 PM2018-08-17T13:34:48+5:302018-08-17T13:44:16+5:30

'भारत' चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेला साउथ कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'वर आधारीत आहे.

Katrina Kaif left for Malta to shoot for 'India' | 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगसाठी कतरिना कैफ माल्टाला रवाना

'भारत' चित्रपटाच्या शूटिंगसाठी कतरिना कैफ माल्टाला रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान व कतरिना दिसणार एकत्र 'भारत' चित्रपटातसलमान व कतरिनाचा एकत्र हा सहावा चित्रपट

बॉलिवूडचा दबंग खान सलमान व बार्बी गर्ल कतरिना कैफ यांनी 'युवराज', 'मैंने प्यार क्यूँ किया', 'एक था टाइगर' व 'टाइगर जिंदा है' या सिनेमात एकत्र काम केले. या चित्रपटातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोघे अली अब्बास जफर यांच्या 'भारत' चित्रपटात दिसणार आहेत.

सलमान खानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माल्टातील फोटो शेअर केला होता आणि माल्टामध्ये भारत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याचे सांगितले होते. आता समजते आहे की अभिनेत्री कतरिना कैफदेखील 'भारत' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माल्टाला रवाना झाली आहे. कतरिनाने इंस्टाग्रामवर सेल्फी शेअर करून सांगितले की तिचे पुढील ठिकाण माल्टा आहे. 


सलमान व कतरिना यांचा एकत्र हा सहावा सिनेमा असून अली अब्बास जफरचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात ही जोडी दुसऱ्यांदा काम करत आहे. या तिघांनी यापूर्वी 'टायगर जिंदा है' या सिनेमासाठी एकत्र काम केले होते.
कतरिनाच्या आधी अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'भारत'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार होती. मात्र प्रियंकाने हा चित्रपट सोडल्यानंतर कतरिनाची या चित्रपटात वर्णी लागली. भारत चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेला साउथ कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'वर आधारीत आहे.  'भारत' चित्रपटाची कथा 1947 म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल.या सिनेमात सलमान व कतरिना यांच्या व्यतिरिक्त दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्युल मुंबईत पार पडले आहे. हा चित्रपट 2019मध्ये ईदच्या वेळी प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Katrina Kaif left for Malta to shoot for 'India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.