कतरिना कैफची डुप्लिकेट करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, फोटो पाहून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 16:52 IST2020-02-21T16:48:28+5:302020-02-21T16:52:15+5:30
कतरिना कैफसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या या अभिनेत्रीला पाहून लखनऊतील लोक फसले होते

कतरिना कैफची डुप्लिकेट करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, फोटो पाहून व्हाल हैराण
सोशल मीडियावर बऱ्याचदा बॉलिवूडच्या सेलेब्सचे डुप्लिकेटचे फोटो पहायला मिळतात. मागील काही दिवसांत करीना कपूर, दीपिका पादुकोण आणि मलायका अरोरा यांच्यासारखे हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्ती चर्चेत आल्या होत्या. आता कतरिना कैफसारखी हुबेहूब दिसणारी एलीना राय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण आहे तिचा आगामी चित्रपट लखनऊ जंक्शन.
एलीना राय सोशल मीडियावरील व्हिडिओ अॅपवरील स्टार म्हणून खूप लोकप्रिय आहे. ती कतरिना कैफसारखी लूक करते आणि तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
एलीना लंडनची आहे आणि आता ती मुंबईत राहते आहे. ती सोशल मीडियावर स्टार असून ती मॉडेलिंगदेखील करते.
जर तुम्ही रॅपर किंग बादशाहची गाणी ऐकत असाल तर त्याचे गाणे कमाल है पाहिले असेल तर तुम्हाला एलीना नक्कीच आठवत अससेल. ती या गाण्यात झळकली आहे.
एलीना फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. ती एक्सरसाईजचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे लूक कतरिना कैफशी खूप मिळते जुळते आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फोटोंना खूप लाइक्स व कमेंट्स येत असतात.
एलीना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती उत्तर प्रदेशमध्ये शूट झालेल्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे लखनऊ जंक्शन.
ती नुकतीच या चित्रपटाच्या पोस्टर व गाण्याच्या लाँचसाठी लखनऊला गेली होती. तिथले लोक तिला कतरिना समजून फसले होते.