कतरिना कैफने सलमान खानलाच नाही तर Exरणबीर कपूरलाही लग्नाचं आमंत्रण दिलं नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 12:41 PM2021-12-03T12:41:45+5:302021-12-03T12:52:15+5:30
ब्रेकअपनंतर कतरिनाने केवळ प्रोफेशनल कमिटमेंट म्हणून रणबीरसोबत 'जग्गा जासूस' सिनेमा पूर्ण केला.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न आता निश्चित मानले जात आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील बरवारा येथील सिक्स सेन्स किल्ल्यावर होणाऱ्या या शाही लग्नाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. 7, 8 आणि 9 डिसेंबरला होणाऱ्या या लग्नासाठी पाहुण्यांना आमंत्रण पाठवण्यात आली आहेत, मात्र काही लोकांना कतरिनाने आमंत्रित केलेले नाही.
कतरिना कैफने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला तिच्या लग्नाला आमंत्रित केले नसल्याचे वृत्त आहे. अर्पिता खानने याला दुजोरा दिला आहे. यासोबत कतरिनाने रणबीर कपूरलाही तिच्या लग्नाचे आमंत्रण दिले नसल्याची चर्चा आहे. कतरिना रणबीर कपूरसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही एकत्र लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
ब्रेकअपनंतर कतरिनाने केवळ प्रोफेशनल कमिटमेंट म्हणून रणबीरसोबत 'जग्गा जासूस' सिनेमा पूर्ण केला. सलमानसोबत मात्र ब्रेकअप झाल्यानंतरही तिने अनेक चित्रपट केले असून सध्या ती 'टायगर 3'चे शूटिंग करते आहे.
आता कपूर कुटुंबातील कोणीही कतरिनाच्या लग्नाला येणार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. यासोबतच कतरिनाने रणबीर कपूर तसंच आलिया भट्टलाही तिच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला कतरिना आणि विकीच्या लग्नाच्यादिवशी मिळतील.
विकी व कॅटने आपल्या लग्नाचे फोटो व व्हिडीओचे राईट्स एका मोठ्या मॅगझिनला विकल्याचे कळतेय. Bollywoodlifeनं याबाबतचे वृत्त दिलं आहे. कपलच्या एका जवळच्या सूत्राच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, विकी व कतरिनाने लग्नाचे फोटो व व्हिडीओचे राईट्स एका आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या भारतीय आवृत्तीला विकले आहेत. या मोबदल्यात मोठी रक्कम कपलला मिळणार आहे.