अरबाज खानने विचारले, ‘क्या है शादी का प्लान’; कतरीना कैफने दिले हे उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:00 AM2019-05-09T06:00:00+5:302019-05-09T06:00:02+5:30
अलीकडे कतरीनाने सलमानचा भाऊ अरबाज खान याच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कॅटने सोशल मीडियावरच्या अनेक कमेंट्सला मनमोकळी उत्तरे दिलीत.
सलमान खानची जवळची मैत्रिण कतरीना कैफ सध्या ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ‘भारत’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमान व कॅटचा आॅनस्क्रिन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान अलीकडे कतरीनाने सलमानचा भाऊ अरबाज खान याच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कॅटने सोशल मीडियावरच्या अनेक कमेंट्सला मनमोकळी उत्तरे दिलीत. अरबाजनेही ‘मौके पे छक्का’ मारत कॅटला एक प्रश्न केला. होय, ‘शादी का क्या प्लान है,’ असे अरबाजने कॅटला विचारले.
अरबाजच्या या प्रश्नाने कॅट लाजली. पण अशातही तिचे ‘डिप्लोमॅटिक’ उत्तर तयार होते. ‘मी कधी लग्न करणार, याची खरच मला काहीही कल्पना नाही. मी आयुष्याचा प्रत्येक दिवस जगतेय. आयुष्य अनिश्चित आहे. इतके की, पुढे काय होईल, हे कुणालाही ठाऊक नाही,’ असे कतरीना या प्रश्नावर म्हणाली. साहजिकच कॅटच्या या उत्तराने अरबाजचे समाधान झाले नाही. त्याने आणखी खोदून विचारले. पण कतरीना बधली नाही. ‘लग्न होईल तेव्हा होईल. विवाह संस्थेवर माझा विश्वास आहे,’ केवळ एवढेच ती म्हणाली.
अलीकडे फिल्मफेअर अवार्डदरम्यान, कतरीना लग्नाबद्दल बोलली होती. मला सिंगल राहायचे नाही. एक बॉयफ्रेन्ड असावाच, असे ती म्हणाली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे, रणबीर कपूर गेल्यानंतर सध्या तरी कॅटच्या आयुष्यात कुणीही नाही. अर्थात सलमान व कतरीनाच्या रिलेशनशिपच्या चर्चा अधूनमधून येत राहतात. सलमान व कतरीनाने लग्न करावे, अशीच चाहत्यांची इच्छा आहे.