Katrina Kaif : एक पोस्ट अन् सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलीय कतरिना कैफ, विकीच्या कमेंटनं वेधलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 02:30 PM2024-07-10T14:30:04+5:302024-07-10T14:31:01+5:30

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ.

Katrina Kaif posts sun kissed picture from Germany, Vicky Kaushal reacts | Katrina Kaif : एक पोस्ट अन् सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलीय कतरिना कैफ, विकीच्या कमेंटनं वेधलं लक्ष!

Katrina Kaif : एक पोस्ट अन् सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलीय कतरिना कैफ, विकीच्या कमेंटनं वेधलं लक्ष!

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. कतरिनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजेच आधीच्या ट्विटर (Twitter) वर कतरिना कैफ (katrina kaif ) ट्रेंडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. कतरिनाचे एक फोटो एक्स (X) वर पोस्ट आणि शेअर केला जात आहे. आतापर्यंत अनेकांनी हा फोटो पोस्ट केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कतरिना ही लाईमलाईट दूर असून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपुर्वी तिचा अभिनेता विकी कौशलसोबतचा लंडनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर पुन्हा ती दिसली नाही. सोशल मीडियावरविकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाने त्याला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर जवळपास दीड महिना कतरिना सोशल मीडियापासून दूर होती. त्यामुळे चाहते तिच्या पोस्टची वाट पाहत होते. 

अखेर आज कतरिनाने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. सध्या कतरिना ही जर्मनीमध्ये आहे. या फोटोमध्ये कतरिना पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसून येत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं 'Good Morning' असं लिहलं. इतक्या दिवसानंतर कतरिनाला पाहिल्याने चाहते भलतेच खूश झाले आहेत. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. एवढंच नाहीतर विकी कौशलनेही वेगवेगळ्या रंगातील हॉर्ट इमोजी कमेंटमध्ये शेअर केले आहेत. दरम्यान, विकी आणि कतरिना गुडन्यूज कधी ऑफिशियल करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
 

Web Title: Katrina Kaif posts sun kissed picture from Germany, Vicky Kaushal reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.