नवरा असावा तर असा! कतरिना कैफनं पती विकी कौशलचं केलं कौतुक, म्हणाली - "तो ४५ मिनिटांपर्यंत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 05:43 PM2024-01-09T17:43:59+5:302024-01-09T17:44:31+5:30
Katrina Kaif : 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या कतरिना कैफने एका मुलाखतीदरम्यान विकी कौशलचे कौतुक केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या चर्चेत आहे. ती तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विजय सेतुपती (Vijay Sethupati) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या कतरिना कैफने एका मुलाखतीदरम्यान विकी कौशलचे कौतुक केले आहे. तिची नॉनस्टॉप बडबड तो कसा ऐकत राहतो हे तिने सांगितले.
पिंकविलासोबतच्या खास मुलाखतीत कतरिना कैफने चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही सांगितले. एका चाहत्याने कतरिनाला विचारले की ती नेहमी इतकी शांत कशी राहते? याला उत्तर देताना कतरिना कैफने विकी कौशलचे कौतुक केले. ती म्हणाली की, मी जेव्हा घरी जाते तेव्हा ४५ मिनिटांपर्यंत माझी बडबड चालू असते. मध्येमध्ये तो बोलत असतो की त्याला काही समजत नाही आहे. कारण मी खूप पटापट बोलते. तो म्हणतो की तुझ्या इंग्लिशमध्ये थोडासा अँक्सेंट आहे आणि मी सगळे काही एक्सप्रेस करते. तो खूपच प्रामाणिकपणे सगळं ऐकतो. त्यावेळी तुम्हाला वाटतं की तुमच्यावरील ओझं कमी झाले आणि मग आम्ही ते सगळे विसरून जातो. अशारितीने मी तुमच्यासमोर शांतपणे येते.
नुकतेच विकी कौशल आणि कतरिना कैफ नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करून परतले आहेत. या जोडप्याने यावर्षी राजस्थानमध्ये आपले नवीन वर्ष साजरे केले. कतरिना आणि विकी या दोघांनीही त्यांच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
'मेरी ख्रिसमस'बद्दल
कतरिनाच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीला हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, पण नंतर तो ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. ८ डिसेंबरला हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धासोबत टक्कर देईल म्हणून तो पुढे ढकलून १२ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.