लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:05 AM2024-05-30T11:05:15+5:302024-05-30T11:05:32+5:30

 विकी-कतरिनाचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. यात कतरिनाने विकीसोबत केलेली कृती पाहून चर्चांना उधाण आलंय. असं काय घडलं नेमकं? (vicky kaushal, katrina kaif)

Katrina kaif pulled back Vicky kaushal crossing the road in London video viral | लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?

लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?

विकी कौशल-कतरिना कैफ हे बॉलिवूडमधलं चर्चेतलं कपल. विकी-कतरिना हे अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. विकी-कतरिनाच्या व्हिडीओ फोटोंवर चाहतेही लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव करत असतात. कतरिनाने काहीच दिवसांपुर्वी विकीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. अशातच विकी-कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओत लंडनमध्ये रस्ता ओलांडताना कतरिनाने विकीला मागे खेचलं. काय घडलं बघा.

कतरिनाने विकीला मागे खेचलं

 विकी-कतरिनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओत  विकी-कतरिना दोघेही ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत.  विकी-कतरिना एकत्र चालत आहेत. तोच विकी रस्ता ओलांडताना थोडा पुढे निघून जातो. इतक्यात कतरिनाला कळतं की कॅमेरात कोणीतरी त्या दोघांचं व्हिडीओ शूट करतंय. कतरिना विकीचा हात धरुन त्याला मागे खेचते. विकीला काय झालं कळत नाही. मग तो सुद्धा मागे येताना कतरिना सांगेल त्या दिशेने पाहायला लागतो. दोघांवर कॅमेराची नजर असते. दोघे आल्यापावली पुन्हा मागे निघून जातात. 

 म्हणून कतरिनाने विकीला मागे खेचलं? चाहत्यांचा अंदाज

कतरिना सध्या जाहीररित्या लोकांमध्ये येत नाहीय. ती शेवटी जानेवारीत रिलीज झालेल्या तिच्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिसली होती. त्यानंतर गेले तीन-चार महिने कतरिना ऑन कॅमेरा येत नाहीय. असंही सांगण्यात येतंय की, कतरिना गरोदर आहे. त्यामुळे बेबी बंप लपवण्यासाठी ती ऑन कॅमेरा येत नाहीय.  लंडनमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधून लोकांंनी तेच अंदाज लावायला सुरुवात केलीय.

Web Title: Katrina kaif pulled back Vicky kaushal crossing the road in London video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.