छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत 'छावा'च्या पोस्टरमध्ये विकी कौशलला बघून कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:03 IST2025-01-20T17:59:36+5:302025-01-20T18:03:15+5:30

कतरिना कैफने विकी कौशलच्या छावाचं पोस्टर पाहून दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (katrina kaif, vicky kaushal, chhaava)

katrina kaif reaction on Vicky Kaushal chhaava movie motion poster | छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत 'छावा'च्या पोस्टरमध्ये विकी कौशलला बघून कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली-

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत 'छावा'च्या पोस्टरमध्ये विकी कौशलला बघून कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली-

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या 'छावा' सिनेमाचं मोशन पोस्टर आज रिलीज झालं. या पोस्टरमध्ये विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत रुद्रावतार बघायला मिळतोय. 'छावा' सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये विकी कौशलला पाहून सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. अशातच विकीची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

कतरिना कैफ विकीच्या लूकवर काय म्हणाली?

कतरिना कैफने विकी कौशलचं 'छावा' सिनेमाचं पोस्टर शेअर करुन खास रिअॅक्शन दिली आहे. फायरचं इमोजी शेअर करुन कतरिनाने तिची खास प्रतिक्रिया दिलीय. एकूणच कतरिनाला विकीचा लूक आवडला असून तिने पसंती दिलीय. विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाच्या सुरुवातीपासूनच कतरिना विकीला पाठिंबा देत आहे. लवकरच  'छावा' सिनेमाचा ट्रेलर लाँच होईल. यावेळी कतरिना विकीसोबत दिसण्याची शक्यता आहे.

विकीचा 'छावा' सिनेमा कधी रिलीज होतोय?

'छावा' सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर २२ जानेवारीला रिलीज होणार आहे. या ट्रेलरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार, याचा उलगडा होईलच. 'छावा'मध्ये छत्रपती शंभूराजेंच्या भूमिकेत विकी कौशल, येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार आहे. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज होतोय. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चंं दिग्दर्शन केलंय. त्यांनी याआधी 'मिमि', 'लुका छुपी' अशा सिनेमांचं दिग्दर्शन केलंय.

Web Title: katrina kaif reaction on Vicky Kaushal chhaava movie motion poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.