"सुपरस्टार किंग कोहली प्रेमळ शेजारी", चाहत्याच्या प्रश्नावर कतरिना कैफची 'विराट' बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 06:16 PM2023-11-18T18:16:19+5:302023-11-18T18:17:00+5:30

कतरिनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये कतरिनाला एका चाहत्याने भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीबाबत प्रश्न विचारला.

katrina kaif said indian cricketer virat kohli is lovely neighbour among world cup 2023 post goes viral | "सुपरस्टार किंग कोहली प्रेमळ शेजारी", चाहत्याच्या प्रश्नावर कतरिना कैफची 'विराट' बॅटिंग

"सुपरस्टार किंग कोहली प्रेमळ शेजारी", चाहत्याच्या प्रश्नावर कतरिना कैफची 'विराट' बॅटिंग

कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना सध्या तिच्या 'टायगर ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'नमस्ते लंडन', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'वेलकम', 'भारत', 'जग्गा जासूस' अशा सुपरहिट चित्रपटांतून अभिनयाची जादू दाखवलेल्या कतरिनाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. कतरिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबाबत ती चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते. कतरिनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. 

या सेशनमध्ये कतरिनाला एका चाहत्याने भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीबाबत प्रश्न विचारला. "विराट कोहलीबद्दल काहीतरी सांग" असा प्रश्न चाहत्याने कतरिनाला विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला कतरिनाने अगदी मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं आहे. चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना कतरिनाने विराट कोहलीचा फोटो शेअर केला आहे. "सुपरस्टार, आदर्श आणि प्रेमळ शेजारी" असं कतरिनाने म्हटलं आहे. कतरिनाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. कतरिना आणि विराट एकमेकांचे शेजारी आहेत.  

दरम्यान, कतरिनाचा 'टायगर ३' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमांत सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पहिल्या दिवसापासूनच 'टायगर ३'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल देशात तब्बल २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

Web Title: katrina kaif said indian cricketer virat kohli is lovely neighbour among world cup 2023 post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.