कतरिना कैफ म्हणते, मैत्रीत ही अपेक्षा करणं चुकीचं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 07:00 PM2018-12-12T19:00:41+5:302018-12-12T19:01:28+5:30
सध्या कतरिना कैफ 'भारत' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे.
बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सलमान खानचा आगामी चित्रपट भारतच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान व दिशा पटानीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारत चित्रपटासाठी कतरिना ही दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती. प्रियांका चोप्राने ऐनवेळी ‘भारत’ला नकार दिल्यामुळे अली अब्बास जफरने कतरिनाकडे चित्रपटात काम करण्याबाबचत विचारले आणि फारसे आढेवेढे न घेता तिने चित्रपटात काम करण्यास होकार दिला.
याबाबत सांगताना कतरिना म्हणाली की, अली अब्बास जफर माझा चांगला मित्र आहे. त्याने याआधी माझी निवड केली नाही याचे मला मुळीच वाईट वाटले नाही. कारण मैत्रीत स्वार्थाची अपेक्षा ठेवणे खूपच चुकीचे आहे. तो मित्र आहे म्हणून मला चित्रपटात काम देईल असे गृहित धरणे चुकीचे आहे. प्रियांकाने नकार दिल्यानंतर अली माझ्याजवळ आला, तुला माझ्यासोबत पुढे जायला आवडेल का? असे त्याने मला विचारले तेव्हा त्याला कोणताही प्रतिप्रश्न न विचारता मी चित्रपटात काम करण्यास होकार दिला.
सध्या कतरिना ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. यापूर्वी प्रियांका या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार होती. मात्र चित्रीकरण सुरू व्हायला एक आठवडा असताना तिने अचानक काम करण्यास नकार दिला. त्यानंतर प्रियांकाच्या जागी कतरिनाची वर्णी लागली. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमान व कतरिनाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.