कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 06:00 AM2019-07-05T06:00:00+5:302019-07-05T06:00:00+5:30

कॅट आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

katrina kaif share her new hot photo on instagram | कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ?

कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ?

googlenewsNext
ठळक मुद्देकतरिनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे

अभिनेत्री कतरिना कैफचा भारत सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला. कॅट आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. कतरिनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच हॉट दिसतेय. 


या फोटोत कॅट स्पोर्ट्स आऊट फिटमध्ये आपलं अॅब्स दाखवताना दिसतेय. स्पोर्ट्स आऊट फिटमध्ये ती एकदम फिट दिसतेय. आपल्या फिटनेससाठी कतरिना तासन-तास जिममध्ये घाम गाळत असते. जिममधील वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असते.    


कॅटरिनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच ती रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. रिपोर्टनुसार, यात ती अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याआधी अक्षय आणि कतरिनाने तीस मार खां, दे दना दन, वेलकम यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडली असून त्यांचे अधिकतर सिनेमे हिट झाले आहेत.

पुढच्या वर्षी २७ मार्चला सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या ती ‘भारत’ सिनेमाच्या यशाची चव चाखत आहे. सलमान खानचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर कमाई करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने २५० कोटींचा पल्ला गाठला आहे. भारत अली अब्बास आणि सलमानचा सलग तिसरा हिट सिनेमा आहे. याआधी दोघांनी टायगर जिंदा है, सुल्तान या दोन सिनेमात एकत्र काम केलं होतं.

Web Title: katrina kaif share her new hot photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.