शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली कतरिना कैफ, शेअर केला बीचवरचा ग्लॅमरस फोटो
By गीतांजली | Updated: November 9, 2020 19:30 IST2020-11-09T19:30:00+5:302020-11-09T19:30:03+5:30
अभिनेत्री कतरिना कैफ सध्या शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली आहे.

शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली कतरिना कैफ, शेअर केला बीचवरचा ग्लॅमरस फोटो
कोरोना व्हायरसमुळे बंद पडलेले टीव्ही, जाहिराती आणि सिनेमांचे शूटिंग पुन्हा सुरु झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली आहे. आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने ही माहिती चाहत्यांना दिली,
कतरिनाने तिचा मालदीवमधला फोटो शेअर करत लिहिले, शूटिंगसाठी मालदीवला येऊन छान वाटतेय. या फोटो कतरिना खूपच ग्लॅमरस दिसतेय. रेनबो शेड्सचे टी-शर्ट तिने यात घातले आहे. कतरिनाची ही स्टाइल फॅन्सना खूपच आवडली आहे. कॅटच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कतरिनाचा 'सूर्यवंशी' सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. यात अक्षय कुमारसोबत कतरिना दिसणार आहे. याशिवाय ती लवकरच 'फोन भूत' सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सोबत दिसणार आहे. तसेच ती अली अब्बास जफरच्या सुपरहीरो सीरिजमध्ये देखील झळकणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे जो नेटफ्लिक्ससाठी तयार करण्यात येतो आहे. यात कतरिना सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे.
1987 मध्ये आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवीचा सुपरहिट फिल्म 'मिस्टर इंडिया' वर आधारित असेल. सिनेमाचे बजेट खूप जास्त आहे आणि शूटिंग चार देशांमध्ये होणार आहे.जागरणच्या रिपोर्टनुसार अली अब्बास अलीकडेच म्हणाला की, सुपरहिरो सिनेमामधील काही सीन्ससाठी त्याने दुबई लॉकशन लॉक केले आहे. अलीने अबु धाबी आणि दुबईमधले काही लोकेशन्स बुक केले आहेत, जिथे सिनेमाची शूटिंग होणार आहे.