रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपबाबत अखेर बोलली कतरिना कैफ म्हणाली, आपण जगात एकटेच येतो आणि एकटेच जातो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 15:33 IST2020-06-11T15:26:42+5:302020-06-11T15:33:22+5:30
मला खूपच त्रास होत होता पण...

रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपबाबत अखेर बोलली कतरिना कैफ म्हणाली, आपण जगात एकटेच येतो आणि एकटेच जातो
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमकथेची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असे. सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफने ब्रेकअप केले होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. कतरिनाश ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर आलिया भटसोबत रिलेशनशीपमध्ये आहे तर कॅटचे नाव विकी कौशलसोबत जोडण्यात येत आहे.
एका मुलाखती दरम्यान कतरिनाने रणबीरच्या नात्याविषयी अनेक खुलासा केला. आमचे ब्रेकअप झाल्यानंतर माझ्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. माझे आयुष्य मी कशाप्रकारे जगतेय, कशाप्रकारे जगायला पाहिजे होते याचा मी अधिक विचार करायला लागले. प्रत्येक गोष्ट ही कोणत्या ना कोणत्या कारणासाठी होत असते. मला आजही आठवतंय, यानंतर काहीकाळ मी खूपच डिस्टर्ब होते. जे झाले ते वाईट होते हेच केवळ मला वाटत होते.
या मुलाखतीत तिने पुढे सांगितले की, त्या काळात मी खूप जास्त वाचन केले. माणसाची मानसिकता कशी असते हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. केवळ एका रात्रीत माझा जगाकडे पाहाण्याचा आणि नात्यांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलला. माझ्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी मला माझ्यापासून दूर करायच्या होत्या. पण मला खूपच त्रास होत होता.पण आता मी सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला शिकले आहे. आपण या जगात एकटेच येतो आणि एकटेच जातो.