कतरिना कैफने 'भारत' चित्रपटासाठी घेतले एवढे मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:49 PM2018-08-20T13:49:26+5:302018-08-20T13:50:30+5:30
प्रियांकाने चित्रपटात काम नकार दिल्यानंतर कतरिना मानधन न ठरवताच काम करायला तयार झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपटात प्रियांका चोप्राने काम करण्यास नकार दिल्यानंतर तिच्या जागी कतरिना कैफची वर्णी लागली. त्यामुळे सलमानही खूश असल्याचे समजते आहे. प्रियांकाने चित्रपटात काम नकार दिल्यानंतर कतरिना मानधन न ठरवताच काम करायला तयार झाली. त्यामुळे सलमानने कतरिनाला प्रियांका चोप्राला देण्यात येणारे मानधन द्यायचे ठरविले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियांकाला १२ कोटी मानधन दिले जाणार होते. तेच कतरिना जवळपास पाच ते सहा कोटी रुपये एका सिनेमासाठी मानधन म्हणून घेते.
कतरिना म्हणाली, ''भारत' चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बासचा मला फोन आला होता. ते मला गोल्डफिश म्हणून संबोधतात. त्यांनी मला सांगितले की मी तूला स्क्रीप्ट पाठवली आहे. मी पटकथा वाचली तेव्हा मला हे पात्र खूप आवडले. मी खूप खूश आहे की मी या चित्रपटाचा भाग बनले आहे.'
सलमान व कतरिनाने 'युवराज', 'मैंने प्यार क्यूँ किया', 'एक था टाइगर' व 'टाइगर जिंदा है' या सिनेमात एकत्र काम केले. या चित्रपटातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोघे अली अब्बास जफर यांच्या 'भारत' चित्रपटात दिसणार आहेत.
सलमान व कतरिना यांचा एकत्र हा सहावा सिनेमा असून अली अब्बास जफरचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात ही जोडी दुसऱ्यांदा काम करत आहे. या तिघांनी यापूर्वी 'टायगर जिंदा है' या सिनेमासाठी एकत्र काम केले होते.
भारत चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेला साउथ कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'वर आधारीत आहे. 'भारत' चित्रपटाची कथा 1947 म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल.या सिनेमात सलमान व कतरिना यांच्या व्यतिरिक्त दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्युल मुंबईत पार पडले आहे. हा चित्रपट 2019मध्ये ईदच्या वेळी प्रदर्शित होणार आहे.