लग्नाच्या काही महिन्यातच विकी-कतरिनामध्ये बिनसलं?,Ex Boyfriend रणबीर कपूर ठरला कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:22 PM2022-07-26T17:22:18+5:302022-07-26T17:33:52+5:30

कतरिना कैफ चांगलीच नाराज झाली आहे. विकी कौशलची तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आहे.

katrina kaif unhappy with ex Ranbir Kapoor cameo role in vicky kaushal film Govinda | लग्नाच्या काही महिन्यातच विकी-कतरिनामध्ये बिनसलं?,Ex Boyfriend रणबीर कपूर ठरला कारणीभूत

लग्नाच्या काही महिन्यातच विकी-कतरिनामध्ये बिनसलं?,Ex Boyfriend रणबीर कपूर ठरला कारणीभूत

googlenewsNext

बॉलिवूडमधील अनेक अभिनेते- अभिनेत्री  एकमेंकासोबत रिलेशनशीपमध्ये होते. पण त्यांचं नातं लग्नपर्यंत पोहोचू शकले नाही. 
काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते वेगळे झाले. यापैकी एक म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ची जोडी. आज कतरिनाने विकीसोबत लग्नगाठ बांधली आहे तर रणबीरने आलियासोबत. कतरिना आणि रणबीरचे ब्रेकअप झाल्यापासून दोघेही एकमेकांचा राग करतात. हे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफरणबीर कपूरवर नाराज आहे. वास्तविक, रणबीर कपूर विकी कौशल(Vicky Kaushal)च्या 'गोविंदा नाम मेरा'(Govinda Naam Mera) या चित्रपटात छोटी भूमिका करताना दिसणार आहे. यामुळे कतरिना कैफ संतापली आहे.

चित्रपटाची निर्मिती करण जोहरचे प्रोडक्शन हाऊस धर्मा करत आहे. या चित्रपटात विकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या  बाकी अपडेट्सबाबत प्रॉडक्शन हाऊसचे ऑफिशनल स्टेटमेंट आलेले नाही. या चित्रपटाच्या रिलीजची तारीखही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु मिड-डे रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की रणबीर कपूर विकी कौशलच्या चित्रपटात छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे.

कतरिना विकीवर नाराज
विकी कौशल आणि रणबीर कपूर दोघेही दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत. याआधी दोघेही 'संजू' चित्रपटात एकत्र दिसले होते. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. ताज्या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की कतरिना कैफ फारशी खूश नाही जेव्हापासून तिला कळले आहे की तिचा एक्स रणबीर कपूर पती विकी कौशलच्या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे.

रणबीर कपूर आणि कतरिना कैफचे ब्रेकअप खूप वाईट पद्धतीने झाले होते. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की कतरिना कैफ चांगलीच नाराज आहे.  मात्र, कतरिना आणि विकीच्या दोघांकडून या रिपोर्टवर कोणतेही ऑफिशल स्टेंटमेंट आलेले नाही.

चर्चेत आहेत कट-विकी
कतरिनाआणि अभिनेता विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली होती. आरोपी मनविंदर सिंहला पोलिसांनी अटक देखील केली आहे. 

Web Title: katrina kaif unhappy with ex Ranbir Kapoor cameo role in vicky kaushal film Govinda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.