बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी अशी दिसायची कतरिना कैफ, २० वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 18:01 IST2023-06-21T18:00:41+5:302023-06-21T18:01:22+5:30
Katrina Kaif : कतरिना कैफचा २० वर्षांंपूर्वीचा जुना व्हिडिओ समोर आला आहे.

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी अशी दिसायची कतरिना कैफ, २० वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कतरिना कैफ (Katrina Kaif) आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. यासोबतच तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत चित्रपटही केले आहेत. दरम्यान, कतरिना कैफचा २० वर्षांंपूर्वीचा जुना व्हिडिओ समोर आला आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. इतकंच नाही तर पडद्यावर दिसणार्या अनेक सुंदर अभिनेत्रींनी मॉडेलिंग जगतापासून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. कतरिना कैफ देखील त्यापैकी एक आहे. कतरिना कैफ आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. यासोबतच तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत चित्रपटातही काम केले आहे. दरम्यान, कतरिना कैफचा २० वर्ष जुना व्हिडिओ समोर आला आहे.
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तिच्या मॉडेलिंग दिवसातील आहे. कतरिना कैफ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. २० वर्षांनंतर तिचा मॉडेलिंग व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कतरिना कैफ खूपच वेगळ्या अंदाजात दिसत आहे. Reddit वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या ड्रेस आणि लूकमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये कतरिना कैफची अतिशय सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे.
Katrina Kaif in a fashion show from 2003
by u/Unable-Airport-9121 in ClassicDesiCelebs
या व्हिडीओत या अभिनेत्रीला ओळखणं कठीण झाले आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ महिलांच्या फॅशनबद्दल बोलताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडतो. कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच टायगर ३ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफसोबत अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.