Katrina Kaif- Vicky Kaushal Marriage: कॅटरिनाच्या लग्नाला सलमान खान जाणार की नाही? पहिली पत्रिका त्यालाच दिलेली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 09:17 AM2021-11-14T09:17:45+5:302021-11-14T09:18:09+5:30
Katrina Kaif- Vicky Kaushal Marriage: सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील संबंध सर्वांनाच माहिती आहेत. तिच्या चांगल्या-वाईट काळात सलमान तिच्यासोबत नेहमी असतो.
बॉलिवूड अॅक्ट्रेस कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांचे लग्न होणार आहे. दोघेही येत्या 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये सात फेरे घेतील. सवाई माधोपुरच्या सिक्स सेंसेस फोर्ट बारवरामध्ये या लग्नाची बुकिंग झाली आहे. कॅबचेही बुकिंग ओव्हरफ्लो झाली आहे. दोघांच्याही टीम जयपूरला तयारीसाठी पोहोचल्या आहेत. या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित असतील असे सांगितले जात आहे.
अशावेळी प्रश्न हा निर्माण होतोय की, बॉलिवडचा दबंग खान सलमान कुटुंबियांसह या लग्नाला उपस्थित राहणार की नाही? झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे कळते आहे. या लग्नाची पहिली निमंत्रण पत्रिका सलमान खानला दिली होती, असे सांगितले जात आहे. सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील संबंध सर्वांनाच माहिती आहेत. तिच्या चांगल्या-वाईट काळात सलमान तिच्यासोबत नेहमी असतो.
या लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांच्या यादीत करण जौहर, कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, मिनी माथुर, रोहित शेट्टी यांची नावे समोर आली आहेत. याशिवाय वरुण धवन आणि नताशा दलाल देखील उपस्थित राहू शकतात. कॅटरिना कैफची रोका सेरेमनी डायरेक्टर कबीर खानच्या मुंबईतील घरी झाली होती. कॅटरिना आणि कबीर हे एकमेकांचे जवळचे असून नातेवाईकही आहेत.