Katrina Kaif-Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलची अशी झाली होती पहिली भेट, व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 19:57 IST2023-05-31T19:57:00+5:302023-05-31T19:57:30+5:30
Katrina Kaif-Vicky Kaushal : २०२१ मध्ये, विकी कौशल आणि कतरिना कैफने अचानक लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या दोघांच्या लग्नाला जवळपास दीड वर्ष झाले असून दोघेही अनेकदा चर्चेत असतात.

Katrina Kaif-Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलची अशी झाली होती पहिली भेट, व्हिडीओ आला समोर
२०२१ मध्ये, विकी कौशल आणि कतरिना कैफने अचानक लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या दोघांच्या लग्नाला जवळपास दीड वर्ष झाले असून दोघेही अनेकदा चर्चेत असतात. दोघांची पहिली भेट कधी आणि कुठे झाली याबद्दल चाहत्यांना अजूनही जाणून घ्यायचे आहे. आता खुद्द विक्की कौशलने याबाबत माहिती दिली आहे. कतरिना आणि विकी यांची पहिली भेट २०१९ मध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये झाली होती. विकी हा अवॉर्ड फंक्शन आयुषमान खुरानासोबत होस्ट करत होता आणि त्यादरम्यान त्याने कतरिनाला प्रपोजही केले होते. लग्नानंतर त्या अवॉर्ड फंक्शनचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी कतरिनाला मंचावर बोलावण्यात आले. त्यादरम्यान विकी कतरिनाला पहिल्यांदा सांगतो की तो तिचा मोठा चाहता आहे. त्यानंतर तो तिला म्हणाला की, "तू चांगला विकी कौशल शोधून का लग्न करत नाहीस." पुढे तो म्हणाला होता की, लग्नांचा सिझन चालू होता, तुम्हालाही तसे वाटत असेल, म्हणून विचारावेसे वाटले." त्यावर कतरिना म्हणाली होती की, "काय?" आणि मग विकी सलमान खानच्या चित्रपटातील संवादाच्या शैलीत "मुझसे शादी करोगी" म्हणतो. विकीच्या या शब्दांवर कतरिनाने सुंदर हसत प्रतिक्रिया दिली. सलमान खानही तिथे बसला होता आणि त्याचे स्मितही खूप छान होते.
सध्या विकी २ जूनला रिलीज होणाऱ्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, त्याने अवॉर्ड फंक्शनच्या त्या व्हिडिओबद्दल सांगितले आणि म्हणाला की मी कतरिनाला जे काही बोललो तो स्क्रिप्टचा भाग होता. स्टेजवर येणार्या सर्व अभिनेत्रींना त्या ओळी बोलायला सांगितल्या होत्या. त्याने सांगितले की कतरिनाशी त्याची ती पहिली भेट होती.