Katrina kaif-Vicky Kaushal Wedding : खास पाहुण्यांसाठी बुक केले VVIP टेंट, १ रात्रीचं भाडं वाचाल तर चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:28 PM2021-12-06T17:28:00+5:302021-12-06T17:29:58+5:30
Katrina Kaif - Vicky Kaushal Marriage : ताज्या रिपोर्टनुसार, वेडिंग प्लानर्सने प्रायव्हसीसाठी पाहुण्यांना सीक्रेट कोड दिले आहेत. ज्याच्या मदतीने ते लग्नात एन्ट्री घेऊ शकतील.
बॉलिवूडमधील या वर्षातील सर्वात मोठ्या लग्नाची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) ९ डिसेंबरला राजस्थान्या सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नात दोघांचेही परिवार सहभागी होणार आहेत आणि सोबतच काही खास लोकांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वेडिंग प्लानर्सने पाहुण्यांचे नाव बदलून त्यांना सीक्रेट कोड दिले आहेत.
ताज्या रिपोर्टनुसार, वेडिंग प्लानर्सने प्रायव्हसीसाठी पाहुण्यांना सीक्रेट कोड दिले आहेत. ज्याच्या मदतीने ते लग्नात एन्ट्री घेऊ शकतील. या कोडची माहिती केवल वेडिंग प्लानर आणि पाहुण्यांना आहे. इतकंच काय तर हॉटेल स्टाफलाही पाहुण्यांचे हे कोड माहीत नाहीत. त्यांना केवळ पाहुण्यांची संख्या माहीत आहे. कतरिना आणि विक्कीला लग्नाचा एकही फोटो लीक होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे त्या पाहुण्यांनाही या टाइट सिक्युरिटीचा भाग बनवलं आहे.
VVIP गेस्टसाठी खास सुविधा
सिस्क सेंस फोर्ट बरवाडाशिवाय ओबेरॉय हॉटेलमध्ये VVIP गेस्टसाठी ८ ते १० टेंटची बुकिंग करण्यात आली आहे. VVIP गेस्टसाठी बुक केलेल्या या टेंटची किंमत ७ हजार रूपयांपासून सुरू होते. कतरिना आणि विक्कीचं लग्न इतकं ग्रॅंड आहे म्हटल्यावर पाहुण्यांसाठीही ग्रॅंड व्यवस्था असणारच. गेस्टसाठी १० डिसेंबर चेकआउट डेट आहे. ओबेरॉय हॉटेलमध्ये २५ पेक्षा रूमची व्यवस्था आहे.
आपल्या पाहुण्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, याची पूर्ण काळजी कपलने घेतली आहे. पाहुण्यांसाठी एअरपोर्टवरून पिक अॅन्ड ड्रॉप व्यवस्था आहे. तसेच पाहुण्यांसाठी टायगर सफारीचीही व्यवस्था आहे. लग्नाच्या ठिकाणी पाहुण्यांसाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था सुरू झाली आहे.